भारताची ‘ही’ कंपनी देणार झोपा काढण्याची सवलत

अनेकांना ऑफिसच्या मॅर्निंग शिफ्टसाठी सकाळी लवकर उठवं लागतं, त्यामुळे त्यांची झोप नीट पूर्ण होत नाही. अशाच कर्मचाऱ्यांसाठी भारतातील एक कंपनीकडून ऑफिसमध्ये अर्धा तास झोपण्याची सूट देण्यात आली आहे.भारतातील या कंपनीचे नाव वेकफिट सॉल्यूशन ने (Wakefit Solutions) असं असून या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना एक मेल आहे. या मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कर्मचारी आता ऑफिसमध्ये दुपारी २ ते २:३० या वेळेत झोपू शकतात. खरंतर कंपनीचे असं मत आहे की, यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी निरोगी राहतील, शिवाय जरा वेळ आराम केल्याने ते पुन्हा उत्साहात काम करू शकतील.

कंपनी ने ईमेल पाठवून केली घोषणा

वेकफिट सॉल्यूशन (Wakefit Solutions) ने या घोषणेशी संबंधीत एक ईमेल केला आहे. या कंपनीचे सह-संस्थापक चैतन्य रामालिंगेगौड़ा ने घोषणा केला की, आता कर्मचारी दुपारी २ ते २:३० पर्यंत झटपट झोप पूर्ण करू शकतात. शिवाय त्यांनी दुपारी झोपण्यासंबंधीत काही माहिती सुद्धा दिली. ते म्हणाले की दुपारी झोपल्याने परफॉरर्मंस चांगला राहतो आणि प्रोडक्टिविटी सुद्धा चांगली राहते.

या कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत घोषणा केली आहे.