घरट्रेंडिंगआधार कार्ड स्टाईलमध्ये छापला लग्नाचा मेन्यू

आधार कार्ड स्टाईलमध्ये छापला लग्नाचा मेन्यू

Subscribe

सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यात काहीतरी हटके वेगळं करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. त्यासाठी नवनवीन कल्पना लढवतात. अशाच एका हटके संकल्पनेमुळे कोलकातामधील बंगाली लग्नसोहळा चर्चेत आला आहे. या लग्नातील मेन्यू कार्ड हे अनोख्या पद्धतीने छापण्यात आले होते. चक्क आधार कार्ड स्टाईलमध्ये या लग्नाला मेन्यू कार्ड छापत डिजिटल इंडियाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे सोशल मिडियावरही या लग्नातील मेन्यू कार्डची चर्चा होत आहे. कोलकत्तामध्ये पेशाने हेल्‍थकेयर प्रोफेशन असणारी गोगोल साहा आणि सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणारा सुवर्णा दास याने फेब्रुवारीमध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याने आपले लग्न इतरांपेक्षा हटके करण्यासाठी मेन्यू कार्डच चक्क आधार कार्ड स्टाईलमध्ये छापण्याचा निर्णय घेतला.

AARR KOTO KI DEKHBO AADHAR MENU CARD🤣🤣🤣🤣

Posted by Souvik Nandi on Thursday, 4 February 2021

- Advertisement -

या हटके मेन्यू कार्डला सोशल मिडियावर अधिक पसंती मिळत आहे. या मेन्यू कार्डची प्रसिद्धी प्रसिद्धी पाहून नवविवाहित सुवर्णा आणि गोगोल यांना अतिशय आनंद होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना दोघांनी सांगितले की. मेन्यू कार्डला मिळणारी लोकप्रियता पाहता आम्हाला खूप आनंद होत आहे. तरी ही संकल्पना माझी पत्नी सुवर्णाला सुचवल्याचे पती गोगोल सांगतो. तसेच डिजिटल इंडियाला पाठींबा देण्यासाठी मेन्यू कार्ड हा उत्तम पर्याय होता. आमचे नातेवाईक देखील हे मेन्यूकार्ड पाहून खूपचं खूश झाले. कारण त्यांच्यासाठी हे मेन्यूकार्ड अगदी युनिक होते. असे गोगोल म्हणाला. त्यामुळे हे हटके मेन्यूकार्ड सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -