घरट्रेंडिंगजेव्हा हरिण वाघाला लपून लपून बघते; नंतर झालं असं काही...

जेव्हा हरिण वाघाला लपून लपून बघते; नंतर झालं असं काही…

Subscribe

वाईल्ड फोटोग्राफी (Wild Photographer) करणाऱ्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून नेहमीच जंगलातल्या वन्यजीवांची कथा समोर येत असते. असेच एक चित्र समोर आले आहे. एका छायाचित्रकाराने काढलेल्या फोटोमध्ये हरिण लपून वाघाकडे बघताना दिसत आहे.

जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाची दहशत संपूर्ण जंगलात असते. वाघ, बिबट्या यांचे आवडते खाद्य हे हरिणाची शिकार आहे. मात्र, या क्षणात पसार होणाऱ्या हरिणाची शिकार करणे वाघ आणि बिबट्यासाठीही फार कठीण असते. ही शिकार करण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात. वाईल्ड फोटोग्राफी (Wild Photographer) करणाऱ्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून नेहमीच जंगलातल्या वन्यजीवांची कथा समोर येत असते. असेच एक चित्र समोर आले आहे. एका छायाचित्रकाराने काढलेल्या फोटोमध्ये हरिण लपून वाघाकडे बघताना दिसत आहे. तुम्ही अनेकदा हे चित्र उलट पाहिलं असेल. कारण अनेकदा वाघ शिकार करण्यासाठी हरिणांना लपून पाहत असतो. त्यानंतर हरिणावर शिकारीसाठी झडप घालतो.

- Advertisement -

हा फोटो IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी शेअर केला आहे. त्यांनी असेही कॅप्शन दिले आहे की, हे हरिण शिकारीपेक्षा लोकांनाच पाहून हैराण झाले असेल.अनेकजणांना जंगलातील प्राणी पाहत जीपमधून जंगलसफारी करायला फार आवडते. मात्र, बहुतांश वेळा या जंगलसफारी करणाऱ्यांचे विक्षिप्त वागणे प्राण्यांना अस्वस्थ वाटू शकते याशिवाय ते प्राण्यांना घातक ठरु शकते. या फोटोमध्ये जंगलसफारीसाठी आलेले लोक जीपमध्ये बसून समोर आलेल्या वाघाकडे पाहत आहेत. वाघाला पाहून फोटो काढण्यासाठी धडपडत तर आहेतच याशिवाय आवाज करत आहेत. मात्र, या लोकांच्या गर्दीला पाहून वाघ तिथून पळून जात असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. याशिवाय त्या वाघाला पाहणारे हरिण या फोटोमध्ये दिसत आहे.साधारणत: नेहमी वाघ हरिणांची शिकार पाहण्यासाठी त्यांना लपून पाहत असतो.अनेक नेटकऱ्यांनीही या फोटोवर कमेंट केली आहे. ‘जंगलसफारी करत जंगलात प्राण्यांना त्रास होईल असे वर्तन करु नये’ अशी कमेंट युजर्सने केली आहे.


 हेही वाचा – दहशतवादाविरोधात NIA ला मिळणार बळकटी; केंद्राकडून 6 शहरांमध्ये कार्यालय सुरू करण्यास मंजुरी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -