तासाभरात मोडलं लग्न, थाकट्या दीरासोबत ‘तिने’ बांधली लग्नगाठ

संभलच्या असमोलीमधून एक अजब घटना समोर आली आहे. अमरोहा येथून लग्नाची वरात घेऊन गेलेल्या एका तरुणाचे असमोलीमधील एका तरुणीसोबत धूमधडक्यात लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही वेळात तिथे मोठा गोंधळ उडाला. लग्नाच्या अवघ्या तासाभरात या पती-पत्नीचा घटस्फोट झाला. शिवाय इतकंच नव्हे कर त्या वधूने नवऱ्याच्या लहान भावाशी लग्न केलं.

खरंकर, ज्या तरुणासोबत वधूचं लग्न झालं होतं. त्याचं आधी देखील एक लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नानंतर अचानक त्याची पहिली पत्नी तिथे आली आणि तिने लग्नाला विरोध करत गोंधळ घातला. मागील काही महिन्यांपासून ती आपल्या माहेरी रुसून गेली होती. त्यामुळे तिच्या पतीने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

CMC issues fresh guidelines for marriage, funeral amid fear of COVID-19 second wave - OrissaPOST

मात्र, पत्नीने गोंधळ घातल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं परंतु पोलिसांनी कारवाई टाळण्यासाठी पंचायत बसवली. पंचायतीच्या आदेशानुसार, एक निर्णय घेण्यात आला. यावेळी पंचायतीत सांगण्यात आलं की, त्या तरुणाने ज्या मुलीशी आता लग्न केलं तिला घटस्फोट द्यायचा आणि तिचं लग्न त्याच्या लहान भावासोबत लावायचं. पुढे काही तासांत त्या तरुणाने नवरीला घटस्फोट दिला आणि तिचं लग्न आपल्या भावासोबत लावून दिलं. आता या लग्नाची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली आहे.

 


हेही वाचा :

कचऱ्यात सापडलेल्या जीन्ससाठी लोकांची झुंबड, किंमत ९४ लाख रुपये