घरट्रेंडिंगझोपत टीव्ही पाहा आणि कमवा २५ लाख रुपये, असा करा अर्ज

झोपत टीव्ही पाहा आणि कमवा २५ लाख रुपये, असा करा अर्ज

Subscribe

प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला असे वाटते की, आरामदायक नोकरी पाहिजे. तिथे झोपण्याची सोय पाहिजे. पण असे काही सत्यात घडतं नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका नोकरीबाबत सांगणार आहोत, जिथे तुम्हाला फक्त आराम करायचा आहे. हे खरं आहे. ब्रिटनची एक अशी कंपनी आहे, जिथे तुम्हाला अंथरुणावर पडू राहण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. एवढेच नाहीतर कंपनी तुम्हाला टीव्ही पाहण्यासाठी देखील व्यवस्था करणार आहे. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता तुम्ही या कंपनीचा जॉबसाठी अर्ज करू शकता.

मिरर या वृत्तसंस्थेनुसार, लग्जरी बेड कंपनी क्राफ्टेड बेड्स (Crafted Beds) ही नोकरी देत आहे. ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक दिवशी ६ ते ७ तास अंथरुणावर पडावे लागेल. या कंपनीमध्ये मॅट्रेस टेस्टरची नियुक्ती केली जात आहे. ज्यांचे काम झोपणे आणि मॅट्रेसबाबत रिव्ह्यू देणे आहे. यासाठी कंपनी दरवर्षी २५ लाख रुपये देणार आहे.

- Advertisement -

क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन म्हणाले की, ‘या नोकरीसाठी ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही आहे. कंपनी तुम्हाला मॅट्रेस पोहोचवेल. तुम्हाला फक्त कंपनीला दर आठवड्याला मॅट्रेसबाबत माहिती द्यावी लागले. जर तुम्ही चांगले लिहिला, तर ही नोकरी तुम्हाला मिळेल.’

महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी ब्रिटिशन नागरिकत्व अनिवार्य आहे. जर तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक ब्रिटनमध्ये राहत असतील तर ही बातमी त्यांना शेअर करा.

- Advertisement -

हेही वाचा – Viral Video: पंजाबी गाण्यावर रावणाचा भांगडा,पहा व्हिडिओ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -