‘Whatsapp’ च्या नव्या फीचरमध्ये आता तुमच्याबद्दल कोण काय बोलतयं हे कळणार

यूजर्सना वेळोवेळी काहीना काहीतरी नवा बदल देण्यासाठी व्हॉट्सअप नेहमीच नवनवीन फीचर आणते.दरम्यान, व्हॉट्सअपने एक नवे फीचर तयार केले आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅपवर तुमच्याबद्दल कोण बोलत आहे? तुम्हाला याची माहिती लगेच समजणार आहे.

This new feature of Whatsapp will let you know who is talking about you
Whatsapp च्या या नव्या फीचरमध्ये तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय हे कळणार

व्हॉट्सअ‍ॅप ही हल्ली सर्वांचीच  मुलभूत गरज झाली आहे. त्यामुळे आपण सर्वजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. या अ‍ॅपने आता इन्स्टंट मेसेजिंगला नवे रूप दिले आहे. हे एक मोठे कारण आहे, ज्यामुळे ते जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यूजर्सना वेळोवेळी काहीना काहीतरी नवा बदल देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन फीचर आणते.दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने एक नवे फीचर तयार केले आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्याबद्दल कोण बोलत आहे? तुम्हाला याची माहिती लगेच समजणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरची जगभरात जोरदार चर्चा होत आहे. प्रत्येकजण स्वत;बद्दल इतर काय बोलत आहेत हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात? अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरच्या मदतीने तुम्हाला याची माहिती लगेचच कळेल.

काय असणार नव्या ‘Whatsapp’ फीचरमध्ये

या फीचरच्या मदतीने, जेव्हा जेव्हा कोणत्याही ग्रुपमध्ये तुमच्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख असेल किंवा तुमचा उल्लेख केला जाईल. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे त्याची माहिती देईल. नोटिफिकेशनमध्ये ग्रुप चॅटमध्ये तुमचा उल्लेख कोणी केला याची माहिती असेल? याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये संबंधित व्यक्तीचा प्रोफाईल फोटोही दाखवला जाईल.

सध्या हे फीचर फक्त iOS बीटा टोस्टरसाठी उपलब्ध आहे. इतर वापरकर्ते आता ते वापरू शकत नाहीत.व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर सध्या चाचणी प्रक्रियेतून जात आहे. लवकरच ते सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. सध्‍या तुमचा उल्लेख एखाद्या ग्रुपमध्‍ये होत असेल, तर त्यासाठी केवळ टेक्स्ट अलर्टच होत आहे.मात्र यूजर्सना आता नव्या व्हॉट्सअ‍ॅप फीचरची उत्सुकता लागली आहे.


हेही वाचा – IND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा खेळाडू