घरट्रेंडिंगचौकशी टाळण्यासाठी कोरोनाची लागण? 'या' राजकीय नेत्यांना बाधा

चौकशी टाळण्यासाठी कोरोनाची लागण? ‘या’ राजकीय नेत्यांना बाधा

Subscribe

कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) सुरु झाल्यापासून संपूर्ण जगाने या विषाणूची धास्ती घेतली आहे. आपल्या आजूबाजूला असलेला एखादा व्यक्ती चुकून शिंकला तरी लोक दोन हात लांब होतात. मात्र, राजकीय वर्तुळात या कोरोनाची धास्ती जरा जास्तच वाढली आहे. गेल्या काही दिवसांत देशातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, महत्त्वाच्या घटनेवेळी अनेक नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. (This political leaders tested corona positive)

सोनिया गांधी

- Advertisement -

Sonia Gandhi asked the ED to extend the time for investigation by a few weeks

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. नॅशनल हेराल्डप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली. २ जून रोजी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण सौम्य लक्षणे असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांना पोस्ट कोवीड समस्या उद्भवल्या. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना १२ जून रोजी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २० जून रोजी सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जन्मदात्री शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

governor said that employment opportunities should be created for the youth

राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून बरीच उलधापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी 40 आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केल्याने ते स्वतंत्र्य गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र गटाच्या अधिकृत मान्यतेसाठी शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने शिंदेंना स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार असे बोलले जात आहे.

हेही वाचा – ठाकरे मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज कोरोनाची लागण झाली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील नाराजी नाट्य पाहता त्यांच्या एका प्रतिक्रियेसाठी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. दरम्यान, सत्तातंराच्या या खेळीमध्ये मुख्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा राजकीय घडामोडी दरम्यान कोरोनाची एंट्री झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -