घरट्रेंडिंगटिक टॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांना अटक

टिक टॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांना अटक

Subscribe

टिक टॉक व्हिडिओ आक्षेपार्ह आणि बदनामीकारक बनवल्यास आता होणार अटक

फेसबुक,व्हाट्सऍप आणि इन्स्टाग्राम नंतर लहान मुलांपासून तरुणांपर्यंत ‘टिक टॉक अॅप’च वेड लागलं आहे. परंतु आता टिक टॉक व्हिडिओ केल्यास त्या तरुणांना अटक करण्यात येणार आहे. टिक टॉक व्हिडिओ केल्यानंतर त्यात काही बदनामीकारक आणि आक्षेपार्ह काही आढळल्यास त्यावर कारवाई करत थेट अटक होऊ शकते अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के पदमनाभन यांनी दिली आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात चिखली परिसरात पैसे न दिल्याने एका व्यक्तीने टिक टॉक अॅपद्वारे व्हिडीओ काढून पतीला कर्करोग असल्याची बदनामी करत मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे आता या टिक टॉकची व्हिडिओ करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे.

व्हिडिओ आक्षेपार्ह वाटल्यास कारवाई होणार

सध्या प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये टिक टॉक हे अॅप असून याच व्यसन मोठ्या प्रमाणावर जडले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक रस्त्यावर काही तरुण टिक टॉक व्हिडिओ तयार करत होते. त्यादरम्यान त्या ठिकाणाहून पोलिसांची गाडी गेली. याविषयी तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता तरुण घाबरले. हे प्रकरण तरुणांनी हसण्यावारी घेतले असले तरी सार्वजनिक रस्ता असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चिखली येथील घटनेत देखील टिक टॉक अॅप आणि व्हिडिओ वापर झाल्याचे समोर आल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी टिक टॉक व्हिडिओमध्ये बदनामीकारक किंवा आक्षेपार्ह वाटल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात वेळ पडल्यास अटक देखील होऊ शकते असे देखील पोलीस आयुक्तांने सांगितले आहे.

- Advertisement -

टिक टॉक या अॅपवर लाखो युजर्स आहेत. ज्यामुळे लाईकसाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. अनेक जणांनी आपल्या मैत्रिणीसोबतचे व्हिडिओ या अॅपवर प्रसारित केले आहेत. त्याला लाखो हजारो लाईक्स मिळत आहेत. साधा व्हिडिओ काढून त्याला गाणे किंवा संवाद जोडत हा व्हिडिओ तयार केला जातो. काही मिनिटात त्याला लाखो लाईक्स मिळत आहेत. अशा वेडेपणामुळे तरुणाई सार्वजनिक रस्त्यावर तसेच शाळा, कॉलेज येथे याचे लोण पोहचले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका शाळेत अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मुलींचा व्हिडिओ काढत समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचा संवाद जोडला होता. यामुळे मुलींना नाहक त्रास सहन करत प्रकरण पोलिसापर्यंत पोहचे होते. याच काही कारणांमुळे शहराचे पोलीस आयुक्त यांनी टिक टॉक व्हिडिओ विषयी निर्णय घेतलेला आहे. तुमच्या काही सेकंदाच्या व्हिडिओमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे टिक टॉक व्हिडिओ काढताना सांभाळून करा अन्यथा त्यात काही बदनामी किंवा आक्षेपार्ह आढळल्यास अटक होऊ शकते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -