घरCORONA UPDATEटिकटॉक स्टारने उडवली मास्कची खिल्ली, आता त्यालाच कोरोनाची लागण

टिकटॉक स्टारने उडवली मास्कची खिल्ली, आता त्यालाच कोरोनाची लागण

Subscribe

आयसोलेशन वॉर्डमधील या व्यक्तीने टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण आता मास्क वापरायला सांगत आहे. व्हिडिओमध्ये, त्याने आपल्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन केलं आहे.

देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. सोशल मीडियावरही विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका टिकटॉक वापरकर्त्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्यावर खिल्ली उडवली होती. या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मास्कची खिल्ली उडवणाऱ्या या तरुणालाच आता कोरोनाची लागण झाली आहे. तपासणीनंतर त्या युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आलं. हा युवक मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. डॉक्टर जीएस पटेल यांनी सांगितलं की, तो कफ आणि ताप आल्यामुळे सरकारी रुग्णालयात आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवालात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, आयसोलेशन कक्षात असूनही तो तरुण टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करत होता. अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्याचा मोबाईल फोन हस्तगत केला. कोविड -१९चा संसर्ग झाल्यानंतरही तो तरुण सतत व्हिडिओ बनवत होता. तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सागरच्या शासकीय बुंदेलखंड मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. जीएस पटेल यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘निहंग’ शिखाने पोलिसाचा हात छाटला; डॉक्टरांनी साडेसात तासात जोडला


देशात कोरोना विषाणू वेगाने पसरत असताना या तरूणाने दुचाकीवर बसून व्हिडिओ शूट केला. “जेव्हा एका व्यक्तीने त्याला मास्क घालायला सांगितलं, तेव्हा त्याने मास्क घालण्यास नकार देत मास्क हवेत टाकतो आणि या कपड्याच्या तुकड्यावर काय यावर काय विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायचा असेल तर देवावर ठेवा,” असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं फार महत्वाचं आहे, यासाठी अनेक राज्यांमध्ये ऑर्डर देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सागर जिल्ह्यात संसर्गाची ही पहिली घटना आहे. त्याचा कोणताही प्रवास इतिहास नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही, आयसोलेशन वॉर्डमधील या व्यक्तीने टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण आता मास्क वापरायला सांगत आहे. व्हिडिओमध्ये, त्याने आपल्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन केलं आहे. रुग्णालय प्रशासनाने या युवकाचा मोबाईल जप्त केला आहे. हा तरुण व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असल्याची तक्रार मिळाली. म्हणूनच प्रशासनाने फोन आपल्या ताब्यात ठेवला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -