घरट्रेंडिंगआईने लेकीसाठी तयार केलेला टिशू पेपरचा गजरा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आईने लेकीसाठी तयार केलेला टिशू पेपरचा गजरा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Subscribe

टिशू पेपर पासून तयार केलेला गजरा अगदी खऱ्या खुऱ्या ताज्या फुलांच्या गजऱ्यासारखा वाटत आहे. नेटकऱ्यांनाही हा गजरा आवडल्याने सध्या टिशू पेपरपासून तयार झालेला गजरा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रत्येकाकडे एक खास कौशल्य असते. कोणत्यातरी विषयात प्रत्येक माणूस पारंगत असतो. आपणही आपले छंद जोपासून अनेक गोष्टी शिकत असतो. अनेक महिला कलाकुसरीच्या वस्तू तयार करुन रोजगार मिळवत आहेत. तर काही जणी आपली आवड, धंद म्हणून वस्तू तयार करतात. असाच एक छंद जोपासून एक सुंदर कलाकृती समोर आली आणि ती सर्वांच्या पसंतीस पडली आहे. एका आईने आपल्या मुलीसाठी तयार केलेला गजरा नेटकऱ्यांनाही प्रचंड आवडला आहे. टिशू पेपर पासून तयार केलेला गजरा अगदी खऱ्या खुऱ्या ताज्या फुलांच्या गजऱ्यासारखा वाटत आहे. नेटकऱ्यांनाही हा गजरा आवडल्याने सध्या टिशू पेपरपासून तयार झालेला गजरा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

सुरेखा पिल्लई नावाच्या एका महिलेने तिच्या ट्विटरवरुन टिशूपासून तयार केलेल्या गजऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमधील हा गजरा अगदी खऱ्या गजऱ्यासारखा वाटत आहे. अनेक लोकही हा गजरा खरा आहे की खोटा हे ओळखताना बुचकळ्यात पडले आहे. ‘माझ्या आईने माझ्यासाठी हा टिशू पेपरपासून गजरा तयार केला आहे’, असे म्हणत सुरेखा पिल्लई यांनी त्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या या गजऱ्याचे फोटो पाहून हा गजरा खरा आहे की खोटा असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. सुरेखा यांनी छानसा कुर्ता घालून केसांच्या अंबाड्यात आईने तयार केलेला टिशू पेपरचा गजरा माळूनही त्यांनी फोटो शेअर केले आहेत. ‘तुम्ही पाहू शकता हा गजरा किती सहजतेने कशावरही माळू शकता’, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

‘माझ्या आईने माझ्यासाठी खूप प्रेमाने आणि मेहनतीने हा गजरा बनवला आहे. माझ्या केसात माळलेला आतापर्यंतचा हा सर्वात सुंदर गजरा आहे’, असे म्हणत सुरेखा यांनी एक व्हिडिओही ट्विटवर शेअर केला आहे. सुरेखा यांच्या व्हायरल झालेल्या गजऱ्याच्या फोटो आणि व्हिडिओला १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक रिट्विट्सही झाले आहेत. तुमची आई खूप अमेझिंग कलाकार आहे अशा अनेक कमेंटही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.


हेही वाचा – बायकोसोबत भांडण झाल्यावर नवरा असे काही करतो जे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -