घरट्रेंडिंगट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म

ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म

Subscribe

अमेरिकन ट्रान्सजेंडर पुरुष बेनेट कॅस्पर विल्यम्सची कथा खूपच अनोखी आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये बेनेटने सिझेरियन ऑपरेशनद्वारे एका मुलाला जन्म दिला. याचे नाव हडसन असे ठेवलेय. ३७ वर्षीय बेनेट एकेकाळी एक महिला होती पण सात वर्षापूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेत बेनेटन तिचे स्तन काढून टाकले पण स्त्रीचे पुनरुत्पादक अवयव कायम ठेवले. बेनेटच्या पतीचे नाव मलिक आहे. एका इंग्रजी वेबसाईटवर यांची एका कथा प्रकाशित केली आहे.

बेनेट यांनी सांगितले की, प्रेग्नेंसीदरम्यान त्यांना एक आरोग्य कर्मचाऱ्याने आई अशी हाक मारली मात्र हे त्यांना आवडले नाही. जेव्हा त्याला कोण आई हाक मारतात तेव्हा त्याला त्याच्या लिंग बद्दल अस्वस्थ वाटू लागते. मात्र कोरोना काळात या लहान मुलाची काळजी घेणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टास्क होता.

- Advertisement -

बेनेटच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाला जन्म देणारे ते वडील आहे हे सांगायला त्यांना अभिमान वाटतो. बेनेटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या बेबी बंप आणि नवजात बाळाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या मुलगा हडसनला दादा म्हणायला शिकवत आहे. ज्यामुळे त्याला लवकरचं वडिलांना पापा म्हणून हाक मारायला जमू शकते.बेनेटच्या मते जेव्हा त्यांचा मुलगा मोठा होईल तेव्हा ते त्याला सांगतील की, त्याला कोणी जन्म दिला. बेनेट यांना खात्री आहे की, त्याचा मुलगा मोठा झाल्यावर तोही हे सत्य स्वीकारेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -