Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर टेक-वेक Video : बाबो! 8 वर्षांचा मुलगा चालवतोय टोयोटा फॉर्च्युनर; बहिणीकडून व्हिडीओ अपलोड

Video : बाबो! 8 वर्षांचा मुलगा चालवतोय टोयोटा फॉर्च्युनर; बहिणीकडून व्हिडीओ अपलोड

Subscribe

लहान मुलं कधी काय करतील आणि कधी काय शिकतील याचा काही नेमक नाही, सोशल मीडियावर अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक 8 वर्षांचा मुलगा चक्क टोयोटा फॉर्च्युनर गाडी चालवताना दिसतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचे सांगितले जातेय. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, एक 8 वर्षांचा मुलगा SUV टोयोटा फॉर्च्युनर गाडी अगदी सहजतेने चालवतोय. या व्हिडीओला आत्तापर्यंत 29,056 व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ 1 एप्रिल 2022 रोजी अपलोड करण्यात आला होता.

‘या’ youtube चॅनलवर व्हिडीओ अपलोड

Ayan and Areeba Show नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ 3 आठवड्यांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. जो चिमुकल्या ड्रायव्हरची 10 वर्षीय मोठ्या बहिणीने (8 वर्षांचा मुलगा) शूट करत आणि यूट्यूबवर अपलोड केला, याला युजर्सने खूप पसंती दर्शवत शेअर करण्यास सुरुवात केली आहे, फॉर्च्युनरच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून एक लहान मूल अतिशय सहजतेने गाडी चालवत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने त्या चिमुकल्या ड्रायव्हर मुलाला विचारले की, तू किती दिवसांपासून गाडी चालवत आहेस, यावर तो चिमुकला उत्तर देतो की, मी 6 वर्षांपासून गाडी चालवत आहे. आधी होंडा सिविक चालवली आणि आता फॉर्च्युनर चालवत आहे. फॉर्च्युनर ही एक हेवी एसयूव्ही आहे. जी चालवण्यासाठी तुमच्याकडे उत्तम ड्रायव्हिंग कौशल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय लहान मुलांनी गाडी चालवणे हा गुन्हा आहे, पण हा व्हिडीओ भारतातील नाही. भारतात गाडी चालवण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया फॉर्च्युनरची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये.

फॉर्च्युनर किंमत आणि तपशील

- Advertisement -

Toyota Fortuner मध्ये 2,755cc 4-सिलेंडर इंजिन आहे जे 3400 Rpm वर 177 Ps पॉवर आणि 1400-2600 Rpm वर 420 Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनच्या बाबतीत, हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी टोयोटा फॉर्च्युनरची किंमत 37.06 लाख रुपये (एक्स-शोरूम, नोएडा) पासून सुरू होते आणि 51.80 लाख रुपयांपर्यंत जाते.


आता कोका-कोला विकत घेईन जेणेकरून कोकेन मिसळता येईल; एलन मस्क यांचे धक्कादायक ट्विट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -