घरट्रेंडिंगबाबो! ग्लोईंग स्किनसाठी लावला घरगुती हळदीचा फेसपॅक आणि झालं होत्याचं नव्हतं

बाबो! ग्लोईंग स्किनसाठी लावला घरगुती हळदीचा फेसपॅक आणि झालं होत्याचं नव्हतं

Subscribe

सुंदर मुलायम त्वचा, त्वचेतील काही किटाणू, घाण बाहेर टाकण्यासाठी हळदीचा खूप फायदा होतो. घरगुती स्वस्तात मस्त फेसपॅक तिला चांगलाच महागात पडला.

हळदीमध्ये अनेक गुणकारी घटक असतात. जेवणातही आपण हळद वापरतो. त्वचेच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यावर हळद हा उत्तम पर्याय असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या फेस पॅकपेक्षा आपल्याकडे नेहमीच हळद हा उत्तम पर्याय सुचवला जातो. आपल्यापैकीही अनेकांनी हळदीचा फेसपॅक लावला असेलचं. सुंदर मुलायम त्वचा, त्वचेतील काही किटाणू, घाण बाहेर टाकण्यासाठी हळदीचा खूप फायदा होतो. घरगुती आणि कधीही उपलब्ध असलेला हळदीचा फेसपॅक असतो. मात्र हा घरगुती फेसपॅक एका तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. ग्लोविंग त्वचेसाठी चेहऱ्यावर हळदीचा फेसपॅक लावला. मात्र त्यानंतर तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पिवळे डाग दिसायला सुरुवात झाली. घरगुती स्वस्तात मस्त फेसपॅक तिला चांगलाच महागात पडला.

स्कॉटलंडमध्ये राहणारी लॉरेन रेनी असे या तरुणीचे नाव आहे. टिकटॉकवर तिचे १७ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. लॉरेनने सांगितल्याप्रमाणे, तिच्या त्वचेवरिल मुरुम, सुरकुत्या आणि त्वचेती जळजळ कमी करण्यासाठी लॉरेन घरगुती उपाय शोधत होती. तिने पाहिले की हळदीचा फेसपॅक हा घरगुती वस्तूंपासून तयार करतात. त्यामुळे तिने हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावायचे ठरविले. फेसपॅक लावल्यानंतर माझा चेहरा पिवळा पडला होता. फक्त माझे ओठ पिवळे पडायचे बाकी होते असे लॉरेनने सांगितले. लॉरेनने चेहऱ्यावर हळदीचा फेस पॅक लावल्यानंतर तिच्या त्वचेच्या रंगात बदल होऊ लागला. जेव्हा मास्क तोंडावरुन काढला तेव्हा माझा चेहऱ्यावर पिवळे डाग पडले होते. मला माझ्या वडिलांसोबत शॉपिंगला जायचे होते. या फेसपॅकमुळे माझ्या चेहऱ्यावर ग्लो येईल असे मला वाटले होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही असे लॉरेनने तिच्या फॅन्सना सांगितले.

- Advertisement -

लॉरेनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या पिवळ्या पडलेल्या चेहऱ्यावर खूप विनोद करत आहेत. लोकांना जेव्हा त्यांची त्वचा ग्लोविंग व्हावे असे वाटते तेव्हा त्यांना अशी त्वचा अशी होते, असे म्हणत नेटकऱ्यांनी लॉरेनची चांगलीच खिल्ली उडवली आहे.


हेही वाचा – पोह्यांचं स्क्रब वापरा, सुंदर दिसा

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -