Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग टिव्ही रिपोर्टरला बंदूकीचा धाक दाखवत ऑन एअर लुटले, व्हिडिओ झाला व्हायरल

टिव्ही रिपोर्टरला बंदूकीचा धाक दाखवत ऑन एअर लुटले, व्हिडिओ झाला व्हायरल

बंदूकीचा धाक दाखवत रिपोर्टरकडून पैशाची मागणी केली. हा सर्व प्रकार लाईव्ह व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला.

Related Story

- Advertisement -

दिवसाचे २४ तास रिपोर्टर लोकांनी दिवसभरात घडामोडींच्या लाईव्ह अपडेट देत असतात. दिवसभर नक्की काय घडत आहे हे त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांना समजत असते. मात्र रिपोर्टिंग करताना अनेकदा रिपोर्ट्सना वेगवेगळे अनुभव असतात. त्यात काही अनुभव हे चांगले असतात तर काही वाईट. अमेरिकेत एका रिपोर्टरला असाच एक अनुभव आलाय मात्र त्यामुळे अनेकांची झोप उडालीय.  एक क्रीडा रिपोर्टर ऑन एअर रिपोर्टिंग करत असताना अचानक रिपोर्टर आणि टिव्ही क्रू मेंबर्सना बंदूकीचा धाक दाखवून चोराने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिपोर्टरकडून पैशाची मागणी केली. हा सर्व प्रकार लाईव्ह व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इक्वाडोरचा क्रीडा पत्रकार डायगो ओडिनोला हा ग्वायाकिल शहरात मागील आठवड्यात रिपोर्टिंग करत होता. त्याचवेळी अचानक एका चोराने बंदूकीचा धाक दाखवत त्यांच्यावर हल्ला केला. चोराने मास्क घातल्यामुळे त्याला ओळखता आले नाही. चोराने बंदूकीचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्याने रिपोर्टवर हमला करुन त्याचा मायक्रोफोन काढून घेतला. त्यानंतर चोराने रिपोर्टरला बाजूला करुन ठेवून बाकीच्या क्रू मेंबर्सवर बंदूक चालवण्याची धमकी दिली. त्याच्याकडून त्यांचे फोन काढून घेतले.

रिपोर्टरच्या लाईव्ह रिपोर्टिंगमध्ये घडलेला हा सर्व प्रकार कॅमेरामनने कॅमेरामध्ये कैद केला. त्यानंतर त्या रिपोर्टरने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केला. आम्ही दुपारी स्टेडिअमच्या बाहेर शांततेत काम करत होतो. तेव्हा अचानक हा प्रकार घडला,असे म्हणत रिपोर्टरने हा व्हिडिओ शेअर केला. न्यूजविकने दिलेल्या माहितीनुसार चोर मोबाईल घेऊन पळाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जवळपास ४ लाख लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा नियम मोडला, महिलेला दंड म्हणून केलं किस, व्हिडीओ झाला व्हायरल

- Advertisement -