घरट्रेंडिंगUnion Budget 2021: 'या' सहा अधिकाऱ्यांनी तयार केला देशाचा अर्थसंकल्प

Union Budget 2021: ‘या’ सहा अधिकाऱ्यांनी तयार केला देशाचा अर्थसंकल्प

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी आज २०२१-२२ चा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला. देशाचा अर्थसंकल्प सादर करताना केवळ केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्य अर्थमंत्री जनतेसमोर येत असतात. तसेच केंद्राचा अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री सादर करत असतात. असे असले तरी केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याकरता अनेकांचा सहभाग असतो. जाणून घेऊया यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणाऱ्या व्यक्तींविषयी…

तरुण बजाज

- Advertisement -

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या तरूण बजाज यांनी पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.


अजयभूषण पांडे

- Advertisement -

भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाचे अर्थात ‘आधार’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळणारे अजयभूषण पांडे. वित्त सचिव महाराष्ट्र प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी. १९८४ च्या महाराष्ट्र कॅडरमधील प्रशासकीय अधिकारी असलेल्या पांडे यांनी कानपूरच्या आयआयटीमधून उच्च शिक्षण घेतले.


टी. व्ही. सोमनाथन

कोलकाता विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पीएच.डी.ची पदवी प्राप्त केलेले, तमिळनाडूतील १९८७ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी असलेले टी. व्ही. सोमनाथन २०१९ च्या डिसेंबरमध्ये या विभागात सचिव म्हणून रुजू झाले.


तुहिन कांता पांडे

भारतीय प्रशासन सेवेतील १९८७ सालच्या तुकडीतील अधिकारी असलेले पाण्डेय ओडिशा राज्याच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव राहिले आहेत.


देबाशीष पांडा

उत्तर प्रदेशच्या १९८७ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी असलेले पांडा यांना राज्य तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे काम केल्याचा अनुभव आहे. गेल्याच वर्षी त्यांची रिझव्र्ह बँक, स्टेट बँकेच्या संचालक मंडळावरही नियुक्ती झाली.


के. व्ही. सुब्रमणियन

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात के. व्ही.सुब्रमणियन यांची नियुक्ती मुख्य आर्थिक सल्लागारपदी करण्यात आली. शिकागोच्या व्यवस्थापन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. करणारे, आणि नंतर हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस येथे अध्यापन करणारे सुब्रमणियन हे आजवरचे देशाचे सर्वात तरुण मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही ओळख.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -