अमेरिकेतील ‘या’ शहरात कुत्रा झाला महापौर!

us small community of rabbit hash in kentucky has chosen a dog as their mayor
अमेरिकेतील 'या' शहरात कुत्रा झाला महापौर!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अजूनही अपूर्णच आहे. पण अमेरिकेतील एका छोट्या शहराने (Rabbit Hash) आपला महापौर निवडला आहे. या शहरातील महापौराचे नाव विल्बर बीस्ट (Wilbur Beast) असं आहे. विल्बर बीस्ट नावाचा माणूस नसून हा एक कुत्रा आहे, जो महापौर झाला आहे. फॉक्सच्या वृत्तानुसार, केंटकीमध्ये रॅबि हॅशच्या छोट्या समुदायाचे फ्रेंच बुलडॉगला आपला नवा नेता म्हणून निवडले आहे. रॅबिट हॅश हिस्टोरिकल सोसायटीच्या म्हणण्यानुसार, विल्बर बीस्टने १३ हजार १४३ मतांनी निवडणूक जिंकली आहे.

रॅबिट हॅश हिस्टोरिकल सोसायटीच्या फेसबुक पेजवरुन बुधवारी महामौर पदाची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, ‘रॅबिट हॅशमध्ये महापौर पदाची निवडणूक झाली आहे. विल्बर बीसट नवे महापौर झाले आहेत. २२ हजार ९८५ मतांपैकी त्यांना १३ हजार १४३ मत मिळाली आहेत. जॅक रॅबिट बीगल अँड पोपी गोल्डन रिट्रीव्हरने दूसरे आणि तीसरे स्थान मिळवले आहे. ‘

केंटकी डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, रॅबिट हॅश ओहिया नदी काठी एक अनधिकृत समुदाय आहे. तो १९९० पासून कुत्र्यांना आपला महापौर म्हणून निवडत आहेत. समाजातील नागरिकांनी हिस्टोरिकल सोसायटीला १ डॉलर दान देऊन आपली मते दिली आहेत.

विल्बर यांनी पदभार स्वीकारला असून तो आता रॅबिट हॅश हिस्टोरिकल सोसायटी आणि इतर धर्मार्थच्या कारणांसाठी निधी गोळा करण्यास मदत करेल. विल्बरचा प्रवक्ता Ammyy नोलँडने फॉक्स न्यूजला सांगितले की, विब्लरने निवडणूक जिंकल्यानंतर स्थानीय आणि जगभरातील समर्थकांचे आभार मानले आहेत. त्यांनी एका लेखी निवेदनात म्हटले आहे की, ‘हा एक रोमांचक साहस आहे आणि केंटकीच्या रॅबिट हॅश शहराचे हॅमलेट शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी एक कारण आहे. या शहारमध्ये जो पण येईल, आम्ही त्याचे सातत्याने मनोरंजन करत राहू.’