भारतीय टोपीची अमेरिकेत क्रेझ, एका टोपीसाठी मोजले जातात 2200 रुपये

अमेरिकेतील शॉप अ‍ॅली म्हणून एक ब्रँड आहे. या ब्रँड नेमंकी कॅपप्रमाणे दिसणारी सेम डिझाइनची टोपी बाजारात आली आहे. मंकी कॅपचे मॉडिफाई करत ही टोपी तयार करण्यात आली आहे.

usa brand selling monkey cap in very high price indians are shocked
भारतीयांच्या टोपीची अमेरिकेत क्रेझ, एका टोपीसाठी मोजले जातात 2200 रुपये

जसा देश तसा वेश ही म्हण तुम्हा ऐकलीच असले याच म्हणीप्रमाणे जसा ऋतु जशी फॅशन आजकाल फॉलो होताना दिसतेय. यात हिवाळ्यात स्टायलिंग करण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे हिवाळी कपड्यांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढते. विशेषत: भारतात कपड्यांच्या फॅशनचा ट्रेन्ड ज्या दिवसापासून येतो त्यादिवसापासून तो ट्रेन्ड पुढील अनेक वर्ष चालतो. अनेकांना हा ट्रेन्ड फॉलो करायला आवडतो, मात्र जग त्यांना जुनी फॅशन फॉलो करते असे सांगू लागते. मात्र, कोणाचीही बोलण्याची पर्वा न करणारे, आरामात जगणारे आणि मनाचे ऐकणारे अनेकजण आहेत. याच भारतीयांकडून आज भारतातील जुना फॅशन ट्रेन्ड फॉलो होताना दिसतोय. तुम्हाला जुन्या चित्रपटांमध्ये पहारेकरी घालत असलेली टोपी आठवतेय का? मंकी कॅप म्हणून ती टोपी ओळखली जायची. या टोपीची भारतात त्याकाळी प्रचंड मागणी होती. मात्र ही मंकी कॅप आता कुठेतरी दिसेनाशी झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या मंकी कॅपची क्रेझ फक्त भारतातच नाही तर अमेरिकेत पाहायला मिळतेय. अमेरिकन नागरिक चक्क आज हजारो रुपये किमतीने ही टोपी विकत घेत आहेत. दरम्यान या टोपीची तुलना तारक मेहता मालिकेतील चंपकलाल यांच्या टोपीशी केली जातेय. तर सोशल मीडियावर बरेच मीम्सही व्हायरल होत आहेत.

अमेरिकेत ३० डॉलरला मिळतेय मंकी कॅप 

अमेरिकेतील शॉप अ‍ॅली म्हणून एक ब्रँड आहे. या ब्रँडने मंकी कॅपप्रमाणे दिसणारी सेम टू सेम डिझाइनची टोपी बाजारात आणली आहे. मंकी कॅपला मॉडिफाय करत ही टोपी तयार करण्यात आली आहे. तसेच त्या टोपीला एक स्कार्फही जोडला आहे. ही टोपी अमेरिकन चक्क $30 म्हणजेच भारतीय चलनानुसार 2200 रुपये किमतीला विकली जातेय.

अशाप्रकारे घाला ही टोपी

आपल्या देशात या टोपीला सर्वात कमी किंमत

तुम्ही विचार करत असाल एवढं काय त्यात. कारण आपल्या देशात या टोपीची किंमत जास्तीत जास्त 200 – 300 रुपये इतकी आहे, परंतु ऑनलाइन मार्केटमध्ये याची किंमत सुमारे 2200 रुपये इतकी आहे. म्हणजेच भारताच्या तुलनेत दहापट अधिक आहे.

टोपीच्या किमतीवर युजर्सचा संताप

स्वस्तात मिळणारी ही टोपी इतक्या महागात विकली जातेय हे पाहून भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले की, भारतीयांनी त्यांच्यावर कॉपीराइट अंतर्गत गुन्हा दाखल करावा.

त्याचवेळी दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मंकी कॅपचे हे अपडेटेड व्हर्जन आहे. मात्र अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही तर यापूर्वी भारतीय कुर्ता गुच्चीने 2.5 लाख रुपये किमतीला विकला होता. ज्याची भारतीय स्थानिक बाजारपेठेत 500 ते 1000 रुपये किंमत असेल.

गुच्चीचा कुर्ता विसरलात?