घरट्रेंडिंगValentine's Week : उद्यापासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात; जाणून घ्या कोणता दिवस कधी...

Valentine’s Week : उद्यापासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात; जाणून घ्या कोणता दिवस कधी साजरा करतात

Subscribe

प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणजेच फेब्रुवारीचा महिना सुरु झाला आहे. या महिन्याची अनेकजण वाट पाहत असतात. कारण या महिन्याच्या पहिला आठवडा हा व्हॅलेंटाईन डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या निमीत्ताने मुलगा किंवा मुलगी जो मुलगा किंवी जी मुलगी आवडते त्या व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करतात. प्रेम हे कधीही व्यक्त करता येऊ शकतं. परंतु व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेम व्यक्त करणं एक वेगळीच भावना असते.

व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरुवात ७ फेब्रुवारीला रोज डेपासून होते. रोज डेनंतर व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रपोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे सारखे खास दिवसही साजरे केले जातात. प्रेमाच्या या आठवड्यात कोणता दिवस कधी साजरा केला जातो हे जाणून घेऊया.

- Advertisement -

पहिला दिवस – ७ फेब्रुवारी रोज डे

७ फेब्रुवारीला रोज डेपासून व्हॅलेंटाईन डे वीकला सुरुवात होते. या दिवशी, प्रेमी एकमेकांना गुलाब देतात.

दुसरा दिवस – ८ फेब्रुवारी प्रपोज डे

८ फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकचा हा सर्वात रोमँटिक दिवस आहे, कारण या दिवशी प्रेमींना आपल्या जोडीदारासमोर त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.

- Advertisement -

तिसरा दिवस – ९ फेब्रुवारी चॉकलेट दिन

व्हॅलेंटाईन आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी आपल्या जोडीदारास चॉकलेट देऊन त्यांच्या नात्यात गोडपणा वाढवतात.

चौथा दिवस – १० फेब्रुवारी टेडी डे

१० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. टेडी डे हा बालपणातील आठवणी परत आणण्याचा दिवस आहे. टेडी एक गोंडस भेटवस्तू आहे, जी सर्वांना आवडते, विशेषत: मुलींना. टेडी डे दिवशी टेडी देऊन आपल्या जोडीदाराचा दिवस स्पेशल करा.

पाचवा दिवस – ११ फेब्रुवारीचा प्रॉमिस डे

व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, प्रेमी त्यांच्या भागीदारांना आयुष्यभर सर्व परिस्थितीत एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात.

सहावा दिवस – १२ फेब्रुवारी हग डे

१२ फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. आपल्या जोडीदाराला मिठी मारुन जो आनंद मिळतो तो शब्दांत व्यक्त करता येत नाही.

सातवा दिवस – १३ फेब्रुवारी किस डे

१३ फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जोडीदारास चुंबन देऊन आपण आपले नातं अधिक मजबूत बनवू शकता.

१४ फेब्रुवारीला, व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस, या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, ज्याची प्रत्येक प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा दिवस प्रेम, आनंद, सुंदर क्षण साजरे करण्याचा दिवस आहे. आपल्या व्हॅलेंटाईन आठवड्याचा प्रत्येक क्षण आपल्या जोडीदारासह संस्मरणीय बनवा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -