Happy Propose Day 2021 : ‘या’ पद्धतीने Propose केल्यास नक्कीच मिळेल होकार

आजच करुन टाका अशा पद्धतीने प्रपोज

एखादी व्यक्ती आवडत असेल किंवा त्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी कोणतीही वेळ किंवा दिवस लागत नाही. आपले प्रेम आपण कधीही व्यक्त करु शकतो. मात्र, असे असले तरी देखील बऱ्याच व्यक्ती प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या एका महिन्याची वाट पाहत असतात. तो महिना म्हणजे फेब्रुवारी. फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो.

‘व्हॅलेंटाईन डे’वीक मध्ये अनेक डे असतात. या डेंची सुरुवात ‘रोज डे’ने होते. ७ फेब्रुवारीला रोज डे असतो. तर ८ फेब्रुवारीला ‘प्रपोज डे’साजरा करतात. या ‘डे’ला आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज केले जाते. पण, होकार किंवा नकार येणे हे काही आपल्या हातात नसते. पण, आज आम्ही तुम्हाला काही अशा ट्रिक्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला कदाचित होकारही मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया, काय आहेत ट्रिक्स.

असं करा प्रपोज

बऱ्याच जणांची प्रपोज करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कोणी फोनवर प्रपोज करत तर कोणी SmS करुन एकमेकांना प्रपोज करत. पण, जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एका विशिष्ट पद्धतीने प्रपोज केल तर नक्कीच होकार येऊ शकतो. याकरता त्या व्यक्तीला एका रोमँटिक ठिकाणी घेऊन जा. नंतर तुम्ही गुडघ्यावर बसून हातात गुलाबाचे फुल त्या व्यक्तीला द्या आणि शायरी म्हणत प्रपोज करा.

फोटो फ्रेम तयार करा

तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीच्या फोटोची फ्रेम तयार करा आणि त्यावर I Love You असा मजकूर लिहा.

तुमची पहिली भेट झाली ते ठिकाण

ज्याठिकाणी तुमची त्या व्यक्तीशी पहिली भेट झाली, त्याठिकाणी घेऊन जा आणि त्याठिकाणी प्रपोज करा. यामुळे जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळेल.

प्रेमाची गाणी पाठवा

तुमच ज्या व्यक्तीवर प्रेम आहे. त्याव्यक्तीला तुम्ही प्रेमाची गाणी पाठवा. तसेच भेटणार असेल तर एखादे गिफ्ट देखील द्या.

surprise द्या

तुम्हाला प्रत्यक्ष बोलायला भिती वाटत असेल तर एखादे गिफ्ट आणि गुलाबाचे फुल तुम्ही सरप्राईज म्हणून देऊ शकता. अशाप्रकारे प्रपोज केल्यास होकार येईण्याची शक्यता काही नाकारता येत नाही.