घरट्रेंडिंगTeddy Day 2022 : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमुळे झाला 'टेडी बिअर'चा जन्म; वाचा या...

Teddy Day 2022 : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमुळे झाला ‘टेडी बिअर’चा जन्म; वाचा या मागची रंजक गोष्ट

Subscribe

जगभरात सध्या व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. या वीकला प्रेमाचा आठवडा असंही म्हणतात. या आठवड्यातील सातही दिवस कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरे केले जातात आणि त्याच्या शेवटच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजे 10 फेब्रुवारी हा दिवस ‘टेडी डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून एखाद्या खास व्यक्तीला टेडी भेट देतात. व्हॅलेंटाईन वीक व्यतिरिक्त इतर अनेक खास प्रसंगी म्हणजे वाढदिवस किंवा फंक्शनला ‘टेडी बेअर’ गिफ्ट दिला जातो.

त्यामुळे बाजारपेठांमध्ये विविध रंगांचे आणि साईजचे टेडी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी बिअरची मागणी खूप वाढते. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकच्या टेडी डे दिवशी एखाद्या खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करण्याचा विचार करत असाल, तर त्या आधी टेडी का साजरा केला जातो नेमका या टेडीचा जन्म कसा झाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

टेडी डे का साजरा केला जातो? (Why is Teddy Day celebrated)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर ‘टेडी’ रुझवेल्ट यांच्या नावावरून ‘टेडी’ हे नाव ठेवण्यात आल्याचे मानले जाते. एकदा ते अस्वलाची शिकार करण्यासाठी गेले होते. पण त्या अस्वलाचा निरागसपणा पाहून त्यांना त्याच्यावर गोळी झाडावीशी वाटली नाही. यावेळी त्यांनी कोणत्याही प्राण्याला न मारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करण्यासाठी त्यावेळी एक गोंडस लहान टेडी/सॉफ्ट टॉय बनवले गेले.

असे म्हटले जाते की, 15 फेब्रुवारी 1903 रोजी न्यूयॉर्कमधील एका कँडी स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम यांनी अधिकृतपणे टेडी बेअर बनवले होते.

- Advertisement -

बालपणाची आठवण करून देणारा हा टेडी बिअर भेट देऊन प्रेम, भावना व्यक्त करु शकता. कारण हा टेडी पाहून समोरच्या व्यक्तीला खूप स्पेशल वाटेल यात काही शंका नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by themktc.in (@themktc.in)

वेगवेगळ्या रंगांच्या टेडीचा अर्थ काय?

1) लाल टेडी (Red Teddy) : तुम्ही त्या खास व्यक्तीला लाल टेडी भेट देऊ शकता, ज्याच्या जवळ तुम्हाला प्रेमळ भावना व्यक्त करायच्या आहेत. यामुळे नाते इमोशनली खूप मजबूत होते.

2) गुलाबी टेडी (Pink Teddy) : जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रपोजलचे उत्तर मिळवायचे असेल, तेव्हा तुम्ही गुलाबी रंगाचा टेडी गिफ्ट करू शकता. समोरच्या व्यक्तीने तो टेडी घेतला तर तुमचे काम झालेचं म्हणून समजा.

3) ऑरेंज टेडी (Orange Teddy) : जर तुम्हाला एखाद्याला प्रपोज करायचे असेल आणि त्या व्यक्तीचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुम्ही या रंगाचा टेडी गिफ्ट करू शकता. ऑरेंज रंगाचा टेडी आनंद, सकारात्मकता आणि चांगल्या स्पंदनेचे प्रतीक आहे.

4) निळा टेडी (Blue Teddy): निळ्या रंगाचा टेडी समोरच्या व्यक्तीवर तुमचे प्रेम किती खोल आहे हे दाखवते.

5) ग्रीन टेडी (Green Teddy): ग्रीन टेडी हे भावनिक जोडणी आणि बांधिलकीचे प्रतीक आहे. जर आपण एखाद्याला हिरवा टेडी दिला तर याचा अर्थ असा होईल की आपण त्याची वाट पाहत आहात.


Happy Propose Day 2022 : मुलींना ‘असं’ प्रपोज करणारी मुलं आवडतात म्हणे; मग, यंदा करा बिनधास्त Propose


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -