घरट्रेंडिंगPropose Day 2022: मुलींना प्रपोज करताना 'ही' चूक करू नका, नाहीतर व्हाल...

Propose Day 2022: मुलींना प्रपोज करताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर व्हाल रिजेक्ट

Subscribe

आज व्हॅलेंटाईन वीकचा (valentines week) दुसरा दिवस आहे. या दिवशी प्रपोज डे (Propose Day) सेलिब्रेट केला जातो. आजच्या दिवशी मुलं आणि मुली एकमेकांच्या मनातल्या गोष्टी सांगतात. समोरच्या व्यक्तीसाठी आपल्या मनातील भावना आणि प्रेम खुलेपणाने व्यक्त करण्यासाठी हा दिवस चांगला असल्याचे म्हटले जाते. अशात त्याचे प्रपोजल स्वीकार होईल की रिजेक्ट हे समोरच्या भावनांवर अवलंबून असते. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल वेगळी भावना असेल तर तो निश्चितपणे प्रपोज केल्यावर हो बोलले. पण प्रेम व्यक्त करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, नाहीतर प्रपोजल रिजेक्ट होऊ शकते. आजच्या दिवशी कोणालाही रिजेक्ट होण्याची इच्छा नसेल. त्यामुळे आज तुम्ही कोणाला प्रपोज करू इच्छित असाल, तर आम्ही सांगितलेल्या चुका करू नका.

घाई करू नका

मुलं नेहमी प्रपोज करताना घाई करतात. असे केल्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. कल्पना करा, जर दोघं काही दिवसांपूर्वी भेटले असतील आणि आतापर्यंत एकमेकांची चांगली ओळख झाली नसेल. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रपोज केले तर रिजेक्ट होऊ शकता. यासाठी एकमेकांना चांगले जाणून घ्या, मैत्री करा आणि नंतर खास दिवशी आपल्या मनातील भावना व्यक्त करा.

- Advertisement -

कोणत्याही दिवशी प्रपोज करू नका

प्रपोज करण्यासाठी एखादा खास दिवस निवडा. जसे की व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रपोज डेच्या दिवशी प्रपोज करू शकता. शिवाय जन्मदिवस, वर्षातील खास दिवस, वर्षाचा शेवट दिवस, सण किंवा कोणता असा दिवस जो समोरच्यासाठी आयुष्यात खास असेल अशा दिवशी प्रपोज करू शकता.

मूड पाहून प्रपोज करा

जर समोरच्या व्यक्तीचा मूड चांगला नसेल किंवा तो व्यक्ती टेन्शनमध्ये असेल तर अशा परिस्थितीत प्रपोज करू नका. त्यामुळे प्रपोज करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचा मूड जाणून घ्या आणि त्याच्यासोबत बोला. ज्यामुळे तुम्हाला कळेल समोरच्या व्यक्तीचा मूड किंवा तो कोणत्या टेन्शनमध्ये आहे, हे समजू शकेल.

- Advertisement -

प्रपोज करण्यासाठी सार्वजनिक ठिकाण टाळा

काही मुलींना सार्वजनिक ठिकाणी प्रपोज करणे आवडते, परंतु जास्तीत जास्त मुलींना ही गोष्ट आवडत नाही. नात्यात येण्यासाठी दोघांच्या मनात भावना सारख्या असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी प्रपोज केले तर मुलीला थोडा संकोच वाटू शकतो. त्यामुळे प्रपोज करण्यासाठी कमी गर्दीचे ठिकाणी निवडा. तसेच मुलीचे मन जिंकायचे असेल तर विश्वास ठेवा. कारण विश्वासाशिवाय कोणतेही नाते पुढे जात नाही.

उत्तर देण्यासाठी घाई करू नका

प्रपोज केल्यानंतर लगेच उत्तर ऐकायची घाई करू नका. कारण प्रपोज केल्यानंतर मुली विचार करतात आणि मगच उत्तर देतात. त्यामुळे उत्तर ऐकण्यासाठी फोर्स करू नका.


हेही वाचा – Happy Propose Day 2022 : मुलींना ‘असं’ प्रपोज करणारी मुलं आवडतात म्हणे; मग, यंदा करा बिनधास्त Propose


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -