Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Vat Purnima 2021: कोरोना काळात घरच्या घरीच साजरी करा वटपौर्णिमा,पहा यंदाचा मुहूर्त

Vat Purnima 2021: कोरोना काळात घरच्या घरीच साजरी करा वटपौर्णिमा,पहा यंदाचा मुहूर्त

आज संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्याने स्रियांनी आपले कुळाचार,कुळधर्म पाळून वडाची पूजा करावी

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ पौर्णिमेला येणारी वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा हक्काचा सण असतो. सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण वाचवले ही कथा सर्वांनाच माहिती आहे. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे यासाठी पत्नी दरवर्षी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सर्व विवाहीत महिलांमध्ये एक वेगळा उत्साह असतो. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या सावटामुळे कोणतेही सण साजरे करता आले नाही. वटपौर्णिमाही महिलांनी घरीच राहून साजरी केली. आजही कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी धोका संपलेला नाही. त्यामुळे महिलांनी घरी राहूनच वट पौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन केले जातेय. (Vat Purnima 2021: Celebrate Vatpurnima at home during Corona)

वट पौर्णिमेचे व्रत हे खरंतर तीन दिवसांचे असते असे सांगितले जाते मात्र तीन दिवस व्रत करणे शक्य नसते त्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केले जाते. भारतीय पंचागांनुसार तिथीनुसार २४ जून रोजी वटपौर्णिमा साजरी करावी असे सांगण्यात आले आहे. आज संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्याने स्रियांनी आपले कुळाचार,कुळधर्म पाळून वडाची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र वडाची पूजा ठरलेल्या मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. जाणून घ्या यंदाच्या वटपौर्णिमेचा मुहूर्त.

- Advertisement -

पौर्णिमेचा आरंभ: २३ जून २०२१ उत्तररात्रौ ३ वाचून २३ मिनिटे

पौर्णिमा समाप्ती: जून २०२१ रोजी उत्तररात्रो १२ वाजून ९ मिनिटे

- Advertisement -

आज संपूर्ण वेळ पौर्णिमा असल्यामुळे स्रियांनी सकाळी आपल्या वेळेनुसार वडाची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी घरी राहून वटपौर्णिमा साजरी करण्याला प्राधान्य दिले आहे.

घरच्या घरी वटपौर्णिमा कशी साजरी कराल?

कोरोनामुळे घरी राहून वट पौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन केले आहे. घराजवळ वडाचे झाड नसेल किंवा बाहेर जाता येत नसेल तर घरी वडाच्या झाडाची फांदी आणा. फांदी देखील मिळाली नाही तर वडाच्या झाडाची प्रतिमा समोर ठेवा. चौरंगावर त्याची स्थापना करा. त्या प्रतिमेला पंचामृत अर्पण करा. त्यावर शुद्ध पाणी अर्पण करा. त्यानंतर वडाच्या झाडाच्या प्रतिमेला किंवा फांदीला हळद,कुंके,फुले, फळे अर्पण करुन नमस्कार करुन नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास वडाच्या फांदीला घरच्या घरीच सात फेर मारा.


हेही वाचा – पनीरचे कटलेट

 

 

 

 

 

 

 

- Advertisement -