घरट्रेंडिंगVideo : 'कच्चा बादाम' पाठोपाठ आता 'पका अमरुद' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Video : ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता ‘पका अमरुद’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Subscribe

‘कच्चा बादाम’ हे गाणे ऐकून आता तुम्हाला कंटाळा आला असले. मात्र याच गाण्याला टफ देणारं एक नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कच्चा बादाम गाण्यावर आज लाखो युजर्स व्हिडीओ बनवत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत आहेत. इतकेच नाही तर अनेक सेलिब्रिटीस् देखील या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसल्या. कच्चा बादाम गाण्यानंतर भुबन बदयाकर या शेंगदाणा विक्रेत्याचे नशीब रातोरात बदलले. ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता एका पेरू विक्रेत्याचे नवं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पेरू विक्रेत्याचा व्हिडीओसमोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याला प्रचंड पसंती देत आहेत. हा पेरू विक्रेता ‘पका अमरुद’ असं एक गाणं गाताना दिसतेय. ज्या पद्धतीने त्याने हे गाणे गायले त्यावरून हे गाणं देखील सुपर हिट होणार असल्याचे बोलले जात आहे.

पेरू विक्रेता झाला आता सोशल मीडिया सेन्सेशन

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मात्र यातून अनेकांना रातोरात प्रसिद्ध होण्याची संधी मिळतेय. आता लोकांच्या डोक्यातून ‘कच्चा बदाम’ गाण्याचा फिवर उतरत नाही तोवर पेरू विक्रेत्याच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय. आता ‘कच्चा बादाम’प्रमाणे या गाण्याला देखील लोकांची पसंती मिळतेय. एक पेरू विक्रेता पेरू कापून त्यावर मीठ लावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या दरम्यान तो पेरू विक्रेता मजेशीरपणे त्यांच्या अंदाजात ‘पका अमरुद’ हे गाणे गातोय.

- Advertisement -

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. foodie_rekha_bisht नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘नमक’. इतर अनेक युजर्स देखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘कच्च्या बदामानंतर आले न्यू साँग’


दाऊदच्या नातेवाईकाला वक्फ बोर्डावर घेतलं; फडणवीसांकडून पुन्हा ऑडिओ क्लिपचा बॉम्ब


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -