घरट्रेंडिंगVideo : हाय गर्मी! स्कूटीची सीट इतकी गरम झाली की एका पठ्ठ्याने...

Video : हाय गर्मी! स्कूटीची सीट इतकी गरम झाली की एका पठ्ठ्याने शिजवला चक्क डोसा

Subscribe

हा व्हिडिओ streetfoodofbhagyanagr या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला 3 लाखांहून अधिक लाईक्स आणि 8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

उफ्फ… ये चिलचिलाती गर्मी! अशी म्हणण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे. कडक उन्हामुळे इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे की पारा 45 अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आता पावसाची वाट पाहत आहेत. मात्र आता नागरिक या उन्हापासून वाचण्यासाठी सावली, शीतपेय, थंड पाणी आणि लिंबू सरबताचा आसरा घेत आहे. मात्र हा उन्हाळा इतका कडक आहे की हैदराबादमधील एका पठ्ठ्याने उन्हाने तापलेल्या स्कूटीच्या सीटवर डोसा बनवला. (dosa video) सध्या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा प्रकार पहिल्यांदाच समोर आलेला नाही. याआधीही काही लोकांनी गाडीच्या बोनेटवर ऑम्लेट बनल्याचे समोर आले होते. (dosa video viral on internet)

स्कूटीच्या सीटवर शिजवला डोसा

या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलेय की, एका व्यावसायिकाने 40 डिग्री तापमानात वेस्पा डोसा बनवला आहे. कृपया घरी हा प्रयत्न करु नका, या व्हायरलमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कडक उन्हात उभ्या असलेल्या स्कूटीवर डोश्याचे पीठ पसरवतो. काही वेळातचं डोसा शिजतोही आणि तो व्यक्ती तो डोसा पलटी करतो. अशाप्रकारे हा व्हिडीओ संपतो. या व्हिडीओवर आता युजर्सकडून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही लोक हा व्हिडीओ पाहून खरचं एवढी गर्मी आहे का असा सवाल करत आहेत. तर काहींना ही एडिटिंगची कमाल वाटतेय.

- Advertisement -


हा व्हिडिओ streetfoodofbhagyanagr या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला 3 लाखांहून अधिक लाईक्स आणि 8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्स यावर मजेशीर कमेंटही करत आहेत. काही युजर्सनी लिहिले की, हे खोटं आहे, तर काहींना हे खरं असल्याचं म्हटलं आहे. तर महागाईने होरपळलेल्या लोकांनी यावर म्हटले की, गॅस वाचवण्याचा हाच जुगाड आहे!


हेही वाचा : अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -