पुष्पाच्या गाण्यावर चक्क कोंबड्यानेही धरला ठेका; व्हिडीओ पाहून सगळेच अवाक्

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणीही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीस येऊन त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. याशिवाय या चित्रपटातील गाणीही तुफान गाजली आहेत. या चित्रपटातील ‘सामी सामी’ आणि ‘ऊं अंटावा’ आणि 'श्रीवल्ली' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

video viral The hen dances to Pushpa's song 'Teri Jhalak Ashrafi Srivalli'
पुष्पाच्या गाण्यावर चक्क कोंबड्यानेही धरला ठेका; व्हिडीओ पाहून सगळेच अवाक्

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणीही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीस येऊन त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. याशिवाय या चित्रपटातील गाणीही तुफान गाजली आहेत. या चित्रपटातील ‘सामी सामी’ आणि ‘ऊं अंटावा’ आणि ‘श्रीवल्ली’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

या चित्रपटाचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडिओंची संख्याही वाढली आहे. ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या चित्रपटातील गाण्याच्या डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडिओ बनवले जात आहेत. या गाण्याने आता प्रेक्षकांसह कोंबड्यालाही वेड लावलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका कोंबड्याने चक्क पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर ठेका धरला आहे. @comedynation.teb या अकाऊंटवरुन हा विनोदी व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Comedy Nation (@comedynation.teb)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कोंबडा अंगणात फिरताना दिसत आहे. अचानक तो ‘श्रीवल्ली’ गाण्यातील अल्लू अर्जुनने केलेल्या हुक स्टेप्स करायला लागतो. हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 9 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.


हेही वाचा – Viral Video : ‘पुष्पा’च्या ‘सामी सामी’ गाण्यावर स्पायडरमॅनचे ठुमके