Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग याला चप्पल सापडेना आणि नेटिझन्सचे विनोद थांबेनात!

याला चप्पल सापडेना आणि नेटिझन्सचे विनोद थांबेनात!

तो त्याची चप्पल कशी शोधणार यावर उत्तर देण्याऐवजी नेटिझन्सनी मजेदार गोष्टी केल्या शेअर

Related Story

- Advertisement -

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे. त्यावर कोणताही फोटो, माहिती काही क्षणार्धात जगभरात पोहोचते. एखादा मजेदार डायलॉग, फोटो, गाणं, व्हिडिओ आणि मिम्स हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतं. या फास्ट लाईफमुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे जोक्स, मिम्स यामुळे थोडी का असेना हसण्यीची संधी मिळते हे मात्र नक्की…

सध्या सोशल मीडियावर असाच एक भन्नाट फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. धावपळीच्या जीवनात अनेकांना बऱ्याच समस्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, तुम्ही हा व्हायरल होणारा फोटो पाहिला तर तुम्हाला देखील ‘त्या’ पठ्ठ्याच्या अडचणीवर हसावं की, नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी, अशा संभ्रमावस्थेच टाकणारा आहे.

असा आहे व्हायरल होणारा फोटो

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर भन्नाट फोटो व्हायरल होत असून हा फोटो पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. या फोटोमध्ये एक व्यक्ती त्याची चप्पल शोधताना दिसत आहे. त्याच्या समोर स्लिपर्सच्या खूप चपला दिसत आहे. तो त्याची चप्पल शोधताना हैराण झालेला दिसतोय. आणि याच त्याच्या अडचणीवर नेटिझन्सनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

या व्हायरल होणाऱ्या फोटोवर नेटिझन्सने यावर मीम्स तयार केले. त्याच्यासमोर असलेल्या सर्व चप्पल एकसारख्या आहेत. त्याची स्लिपर त्याला मिळावी याकरता अनेकांनी त्याला मदत व्हावी याकरता नेटिझन्सनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तो त्याची चप्पल कशी शोधणार यावर उत्तर देण्याऐवजी नेटिझन्सनी मजेदार गोष्टी शेअर केल्यात. सध्या तरी हा व्हायरल होणारा फोटो कुठला आहे हे माहिती नाही. मात्र हा फोटो बघून तुम्हाला उत्स्फुर्त हसायला येईल हे मात्र नक्की…

- Advertisement -

- Advertisement -