Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Viral Photo: आम्ही लग्नाळू ! वधूच्या शोधासाठी एका अवलियाची भन्नाट शक्कल, केलं...

Viral Photo: आम्ही लग्नाळू ! वधूच्या शोधासाठी एका अवलियाची भन्नाट शक्कल, केलं असं काही…

Subscribe

देशभरात लग्न करण्याच्या पद्धती या ठिकठिकाणी वेगवेगळ्या आहेत. याशिवाय हल्ली वधूवर सूचक मंडळात लग्नाळूंची नावे नोंदवण्यासाठी धावपळ सुरु असते.हल्ली बऱ्याच मॅट्रिमोनिअल साइटसचे जाळे होत चालले आहे.सध्या इंग्लंडमध्ये राहणारा एक अवलिया तरुण लग्न करण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

हल्ली सोशल मिडियावर कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही. मात्र, सध्या एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. भारतातील बहुतांश कुटूंब हे अरेंज मॅरेजला जास्त महत्त्व देत असतात. याशिवाय देशभरात लग्न करण्याच्या पद्धती या ठिकठिकाणी वेगवेगळ्या आहेत. याशिवाय हल्ली वधूवर सूचक मंडळात लग्नाळूंची नावे नोंदवण्यासाठी धावपळ सुरु असते. हल्ली बऱ्याच मॅट्रिमोनिअल साइटसचे जाळे होत चालले आहे. सध्या इंग्लंडमध्ये राहणारा एक अवलिया तरुण लग्न करण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. त्यामुळे एका पठ्ठ्याने भन्नाट शक्कल लढवली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मलिकने आपल्या लग्नासाठी बर्मिंगहॅम शहरात चक्क मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत.त्यामुळे त्याच्या या गजब कल्पनेमुळे सोशलमिडियावर चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

आपल्या लग्नासाठी वधू शोधण्याचा अनोखा मार्ग शोधत मोहम्मद मलिकने शहरभर जाहिराती लावल्या आहेत.हा पठ्ठ्या इतक्यावरच थांबला नाही तर, त्याने नववधूच्या शोधासाठी एक वेबसाइटही तयार केली आहे. जेणेकरुन, लग्न करु इच्छिणाऱ्या अविवाहित मुली त्याच्याशी संपर्क करु शकतात. या वेबसाइटसह, मोहम्मद मलिकने यूट्यूबवर देखील वधूचा शोध सुरू केला आहे. स्वत:साठी परफेक्ट वधू शोधण्यासाठी या अवलियाचा बराच खटाटोप सुरु आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Family Pension : ‘या’ लोकांकडून हिरावून घेतला जाणार ‘फॅमिली पेन्शन’चा अधिकार, जाणून घ्या काय आहेत नियम!


 

- Advertisment -