घरट्रेंडिंगअहो आश्चर्य! समुद्रात चालतो हा मासा; बघा व्हिडिओ

अहो आश्चर्य! समुद्रात चालतो हा मासा; बघा व्हिडिओ

Subscribe

आतापर्यंत मासा पाण्यात पोहोतो हे आपल्याला माहित आहे. मात्र समुद्रात मासा कधी चालत असल्याचे ऐकले किंवा वाचले आहे का? मासा आणि चालणं… हे जरी अतिश्योक्ती वाटत असलं तरी हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर चालणाऱ्या माशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर याच माशाची चर्चा आहे. नॉनव्हेज जेवणात सुरमई, हलवा, कोळंबी, पापलेट, बांगडा यासारख्या कित्येक प्रकारचे मासे आपण पाहिले आहेत. तर मत्सालयात दिसणाऱ्या वेगवेगळ्या आकारापासून त्यांच्या रंगातील वैविध्यांपर्यंत आपल्याला माहित असते. परंतु मासा पाण्यात पोहण्याऐवजी चालूच लागला तर….

कॅरेबियन समुद्रीजीव तज्ज्ञ आणि लेखक मिकी कार्टरिस यांनी हा चालणारा मासा शोधला आहे. हा मासा नेहमी पेक्षा थोडासा वेगळा आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हा मासा गडद राखाडी रंगाचा दिसत असून त्याच्या विचित्र शरीरावर गेंड्यासारखं एक शिंगही दिसतं. दिसायला भीतीदायक दिसणाऱ्या या माशाची चालण्याची पद्धथ वेगळी असल्याने लक्षवेधी ठरते. त्याचे ओठ लाल रंगाचे आहेत.

- Advertisement -

असा आहे हा व्हायरल व्हिडिओ

हा मासा समुद्राच्या तळाशी राहतो. त्याला माशाप्रमाणे पर तर आहेत पण पायही असल्याचे या व्हिडिओमध्ये समुद्रतळाशी उतरून हा मासा आपल्या पर आणि पायांच्या साहाय्याने हळूहळू चालतो. छोटे मासे आणि छोटे खेकडे त्याची शिकार आहेत. तर गरज असेल तेव्हाच हा मासा पोहोतो.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कॅरेबियन समुद्रीजीव तज्ज्ञ आणि लेखक मिकी कार्टरिस यांनी पहिल्यांदा जेव्हा हा मासा पाहिला तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. कारण, इतकी वर्षं या क्षेत्रात राहून त्यांनी असा वेगळा मासा कधीच पाहिला नव्हता. हा मासा अत्यंत दुर्मीळ असून खूप कमी ठिकाणी आढळतो. या माशाचा एक व्हिडिओही त्यांनी बनवून व्हायरल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -