घरट्रेंडिंगकलियुगातल स्वयंवर, धनुष्य तोडून वधूच्या गळ्यात घातली वरमाला

कलियुगातल स्वयंवर, धनुष्य तोडून वधूच्या गळ्यात घातली वरमाला

Subscribe

त्रेता युगातील भगवान श्री रामांच्या स्वयंवराची कहाणी आपण नक्कीच ऐकली असेलच, पण आता कलियुगातही अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यात रामायण कथेप्रमाणे स्वयंवर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात वराने धनुष्य तोडले आणि वधूच्या गळ्यात वरमाळ घातली. त्यामुळे या अनोख्या विवाह सोहळ्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सारण जिल्ह्यातील सोनपूरमधील सबलपूर पूर्व भागात या अनोख्या त्रेता युगातील धनुष्य स्वयंवर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात त्रेता युगात भगवान श्री रामांनी धनुष्य तोडून माँ सीतेशी लग्न केले, त्याचप्रकारे सबळपूर पूर्वे भागात कलियुगातील धनुष्य स्वयंवर विवाह सोहळ्याचे आयोजन मध्यरात्री करण्यात आला.

- Advertisement -

परंतु या त्रेता युग आणि आत्ताच्या कलियुगातील स्वयंवर सोहळ्यात इतकाच फरक होता की, त्रेता युगातील स्वयंवर सोहळ्यात महान योद्धे होते. तर राजा जनक यांनी वचन दिले होते. परंतु या विवाह सोहळ्यात सर्वकाही ठरवून आणि काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. परंतु हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या विवाह सोहळ्याच्या मंचावरील पंडितांनी मंत्र-जप करून भगवान श्री रामांच्या स्वयंवराप्रमाणे विवाहाच्या सर्व विधी केल्या. त्यानंतर वराने धनुष्य उंचावण्याआधी दोन्ही हात जोडून भगवान श्री रामांची प्रार्थना केली. त्यानंतर धनुष्य हवेत उंचावले.

वराने धनुष्य हवेत उंचावून मोडताच समारंभात उपस्थित लोकांनी भगवात श्री रामांच्या, माँ सीतेच्या नावाने जयजयकार केला. या वर आणि वधूवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला. दरम्यान वधुच्या मैत्रिणांनी मंगल गीत गात वधूला रंगमंचावर आणले. त्यानंतर वधू आणि वराने एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातला. परंतु कोरोना काळात आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांना पायदळी तुडवण्यात आले. एक फुटाचे अंतर राखणे दुरचं लोक एकमेकांच्या बाजूला उभे राहून या अनोख्या विवाह सोहळ्याचा आनंद घेत होते.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -