घरट्रेंडिंगVideo : चिमुरड्यावर हल्ला करण्यासाठी वाघ आला आणि...!

Video : चिमुरड्यावर हल्ला करण्यासाठी वाघ आला आणि…!

Subscribe

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आयर्लंडच्या डब्लिनमध्ये एक अशी दुर्घटना घडली आहे ज्याने सर्वांना चकित केलं आहे. एक चिमुरडा आपल्या वडिलांसोबत प्राणीसंग्रहालयात भेट देण्यासाठी गेला होता. त्यावेळेस त्या मुलावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेसाठी काच असल्यामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला. ७ वर्षांच्या हा चिमुरडा प्राणीसंग्रहालयाबाहेर फोटो काढतं होता. त्यादरम्यान वाघ मागून पाहतं होता. ज्यावेळेस मुलाने मागे वळून पाहिलं त्यावेळेस वाघ शिकारी करण्यासाठी जोरात पळाला आणि आरशाला धडकला. मुलाच्या वडिलांनी या क्षणाचा व्हिडिओ केला आणि तो ट्विटवर शेअर केला. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ २३ डिसेंबरला शेअर केला होता. आतापर्यंत २ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले असून ४६ पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच १० हजाराहून अधिक री-ट्विट केला आहे.

एका वापरकर्त्याने लिहिलं, ‘आरशावर वाघ धडकला असल्यामुळे त्याच्या डोक्याला फारचं लागलं असेल.’ तर दुसऱ्या वापरकर्ता म्हणाला, ‘या मुलासाठी हा अद्भुतक्षण आहे. मात्र वाघ यामध्ये फारचं वाईट दिसतं आहे. वाघाला खूप जोरात लागलं असेल.’

- Advertisement -

हेही वाचा – कल्की कोचलीनचे हॉट बेबी बम्प फोटो शूट व्हायरल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -