Video : थेट विमानातून उतरुन केला ‘किकी’ डान्स

या व्हिडिओला नेटिझन्सनी कितीही पसंती दिली असेल, तरी जीवघेण्या किकी चॅलेंजची अद्याप कायम असलेली क्रेझ यातून समोर आली आहे.

pilot kiki challenge
सौजन्य- युट्यूब

सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून KiKi Challege ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जो तो, जिथे तिथे किकी डान्स करत सुटला आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रीटिजपर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर किकीचं भूत सवार आहे.  आतापर्यंत या किकी चॅलेंमुळे अनेक ठिकाणी जीवघेणे अपघातही घडले आहेत. मात्र, तरिही किकीची क्रेझ काही कमी झाल्याचं दिसत नाहीये. दरम्यान याच संदर्भातला एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. चक्क दोन महिला पायलट विमानातून खाली उतरुन हा Kiki डान्स करत असल्याचं, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. याआधी चालत्या कारमधून तसंच लोकल ट्रेनमधून उतरुन किकी डान्स केल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, आता थेट विमानामधून उतरुन किकी डान्स केल्यामुळे, हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटिझन्सची कितीही पसंती मिळत असली तरी यामुळे जीवघेण्या किकी चॅलेंजची अद्याप कायम असलेली क्रेझ उजेडात आली आहे. दरम्यान एलेजेंड्रा असं या व्हिडिओमधील एका महिला पायलटचं नाव आहे. ही महिला पायलट थेट कॉकपीटमधून खाली उतरुन किकी गाण्यावर डान्स करायला लागल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाहा : राखीचा विमानाच्या टॉयलेटमध्ये Kiki डान्स

 

व्हिडिओ सौजन्य- युट्यूब

पाहा : हा Video पाहा आणि सावध व्हा

काय आहे KiKi Challenge ?

जगभरातील लोकांना kiki challenge मध्ये तुम्ही ज्या गाण्यावर डान्स करताना पाहता, ते मूळ गाणं ‘इन माय फिलिंग्स’ या अल्बमधील आहे. या गाण्याची निर्मिती कॅनडाचे नामांकित गायक आणि रॅपर ड्रेक यांनी केली आहे. स्वत: ड्रेक यांनीच हे गाणं गायलं देखीस आहे. हे गाणं लाँच झाल्यानंतर युट्यूब कॉमेडिएन शिग्गी याने त्यावर चालत्या गाडीतून उतरत एक डान्स केला. हाच डान्स सोशल मीडियावर # बनला असून, जगभरातील लोक किकी डान्सचा हा ट्रेंड फॉलो करत आहेत.