Video: पिझ्झाच्या ओव्हनमध्ये शिजून निघाला साप!

पिझ्झा बेकिंगसाठी ओव्हनमध्ये ठेवला होता. मात्र त्या ओव्हनमध्ये साप असल्याचं कळलं नाही.

viral video north carolina family finds snake in oven while baking pizza
Video: पिझ्झाच्या ओव्हनमध्ये शिजून निघाला साप!

उत्तर कॅरोलिनामध्ये अशी घटना घडली की ती ऐकून तुम्ही देखील हैराण व्हालं. एका कुटुंबातील सदस्याने रात्रीच्या जेवणासाठी पिझ्झा बेकिंगसाठी ओव्हनमध्ये ठेवला होता. जेव्हा ओव्हन बेकिंगसाठी सुरू केलं तेव्हा आतमध्ये एक साप तडफडत होता. त्या ओव्हनमधून धूर येऊ लागला आणि दुर्गंध पसरला. म्हणून जेव्हा त्यांनी ते ओव्हन उघडलं तेव्हा त्यामध्ये त्यांना एक साप मृत अवस्थेत आढळून आला.

डब्ल्यूआरएएल या वृत्तवाहिनीशी बोलताना कुटुंबातील एका सदस्यानं असं सांगितलं की, ओव्हन मधून धूर निघत होता. त्यावेळेस मी घरातील सदस्यांना त्या ओव्हनपासून दूर राहण्यास सांगितलं. मग मी स्वतः ओव्हन उघडला तेव्हा साप मृत अवस्थेत आढळला.

तर रॉबर्ट म्हणाला, तो साप शांत होता आणि खूप भीतीदायक देखील होता. ओव्हनमध्ये मृत साप आढळने हे एक भयानक स्वप्नाप्रमाणेचं होत. तसंच तो सुमारे १८ इंच लांब असल्याचं वृत्तवाहिनीला सांगितलं.

ओव्हनमध्ये काहीही ठेवलं नसल्याचं कुटुंबियांनी संगितलं. सीएनएनशी बोलताना याचं कुटुंबातील सदस्यानं सांगितलं, आम्ही ख्रिमसच्या वेळी हॅम शिजवण्यासाठी शेवटचा ओव्हन वापरला होता. पिझ्झा बेकिंगसाठी ठेवताना लक्ष दिलं नाही. जेव्हा ओव्हनमधून विचित्र वास आला तेव्हा आम्हाला ओव्हनमध्ये पिझ्झा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं असल्याचं समजलं.

त्यानंतर या कुटुंबाने सर्प मित्रांना बोलावलं आणि घरामध्ये इतर ठिकाणी साप आहे की नाही यांची पाहणी करायला सांगितलं.


हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! मुलाच्या लांब नाकामुळे मुलीने लग्न मोडलं!