Video: हळद लावण्यासाठी केला भन्नाट जुगाड, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

viral video social distancing haldi ceremony during coronavirus pandemic watch
Video: हळद लावण्यासाठी केला भन्नाट जुगाड, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाच्या काळाला पाच महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील कोरोना व्हायरसचा कहर थांबायचे काही नाव घेत नाही आहे. अशा परिस्थिती लोकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे आता महामारीच्या काळात लोकं कोरोनासोबत जगत आहेत. लोकं घरातून बाहेर पडून काम करत आहे. अशा परिस्थितीत लग्न समारंभ सोहळा देखील पार पडतं आहे. पण या शुभ समारंभाच्या दिवशी कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. दरम्यान हळदी लावण्यासाठी केलेला एक भन्नाट जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. हळदी समारंभातील हा जुगाड पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

हा मजेदार व्हिडिओ ट्विटर युजर पायल भयानाने २६ सप्टेंबरला शेअर केला आहे. तिने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सोशल डिस्टन्सिंग हळदी समारंभ.’ नेटकऱ्यांना हा जुगाड खूपच आवडला आहे. या व्हिडिओला ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि जवळपास २ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओ पाहून काय म्हणाले नेटकरी?