Video: गाडी घेऊन पळाला चोर; मालकाने नग्नावस्थेत पाठलाग करत पकडलं चोरालं आणि…

viral video the owner chased naked and caught the thief

रात्री झोपताना माणूस बिनधास्त झोपतो. काहींना झोपताना कपडे काढून झोपायची सवय असते. अशावेळी चोरी झाली तर आधी कपडे घालू नंतर त्या चोराला पकडू. मात्र, अमेरिकेतील न्यू कॅसलमध्ये अशी काही घटना घडली की तुम्ही चकित व्हाल. न्यू कॅसलमध्ये एका घरात चोराने गाडी पळवून नेली. यावेळी नग्नावस्थेत झोपेत असलेल्या मालकाने चोराला पकडण्यासाठी आहे त्या अवस्थेत घरातून बाहेर पडला.

अमेरिकेतील न्यू कॅसलमध्ये घटना घडली आहे. गाडीचा मालक रात्री घरी नग्नावस्थेत झोपला होता. त्यावेळी रात्री एका चोराने त्याच्या घराजवळील त्याची गाडी पळवली. गाडीच्या मालकाला चोर गाडी पळवत असल्याचं समजताच आहे त्या स्थितीत चोराचा पाठलाग केला.

न्यू कॅसल इथे २९ वर्षीय स्टिफन आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहातो. रात्री सगळं आवरून निवांतपणे स्टिफन झोपी गेला. अचानक त्याची बाहेर लावलेली गाडी चोरण्यासाठी चोर आला. त्यावेळी गाडीचा सिक्युरिटी सायरन वाजला. त्यामुळे तो आहे त्या नग्न अवस्थेत पळत बाहेर आला. त्यावेळी त्याला दिसलं की चोर त्याची कार चोरण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी क्षणाचाही विलंब न करता या चोराचा पाठलाग केला. या वेळी आपण विवस्त्र आहोत याचाही विसर स्टिफनला पडला. चोराला पकडणं हे एकच त्याच्या डोक्यात होतं. त्याने चोराचा पाठलाग करून चोराला पकडलं आणि बेदम मारहाण देखील केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.