घरट्रेंडिंगसोशल मीडियावरसुद्धा 'विराट' खातोय भाव

सोशल मीडियावरसुद्धा ‘विराट’ खातोय भाव

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियावरही चांगलाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. विराटची सध्या इन्स्टाग्रावर घसघशीत कमाई होत आहे. विराट प्रत्येक पोस्टमागे तब्बल ८२ लाख रुपये कमवतो.

भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. विराटचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियातून आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि सेलिब्रेटी यांना प्रचंड प्रसिद्धी मिळतेच मात्र आता त्यांना बक्कळ कमाई देखील मिळत असल्याचे समोर आले आहे. ‘इन्स्टाग्राम’ वरील फोटोंचे ऑटोमॅटिक वेळापत्रक करणाऱ्या ‘होपर एचक्यू’ या यंत्रणेतून २०१८ मधील आघाडीची यादी समोर आली आहे. या यादीनुसार इन्स्टाग्रामच्या प्रत्येक पोस्टमागे विराटला तब्बल ८२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याने विराट सोशल मीडियावर देखील चांगलाच भाव खात आहे.

इन्स्टाग्रामवरील उत्पन्नाच्या आघाडीवर कोण?

‘होपर एचक्यू’ या यंत्रणेतून इन्स्टाग्रामवरील उत्पन्नाच्या आघाडीची यादी आली असून यामध्ये प्रत्येक पोस्टमधून किती कमाई होते हे स्पष्ट होते. या यादीमध्ये एखाद्या युजर्सचे फॉलोवर्स, प्रत्येक पोस्टला मिळणारा प्रतिसाद या सर्वांचा समावेश असतो. या यादीमध्ये विराट कोहली नवव्या क्रमांकावर असून त्याला प्रत्येक पोस्टमागे सुमारे ८२ लाख रुपये मिळत आहेत. तर अमेरिकतील मॉडेल आणि उद्योजक कायली जेन्नर ही पहिल्या क्रमांकावर असून तिला प्रत्येक पोस्टमागे १० लाख डॉलर मिळत असल्याचे समोर आले आहे.

‘होपर एचक्यू’ यादीतील पहिल्या दहा व्यक्ती कोण (रक्कम डॉलरमध्ये)

  • कायली जेन्नर १० लाख
  • सेलेना गोमेज ८ लाख
  • ख्रिस्तियानो रोनाल्डा ७.५ लाख
  • किम कार्दशियान ७.२ लाख
  • बियॉन्स नॉवल्स ७ लाख
  • ड्वेन जॉन्स ६.५ लाख
  • जस्टीन बिबर ६.२ लाख
  • नेमार ज्युनिअर ६ लाख
  • लिओनेल मेस्सी ५ लाख
  • केंडल जेन्नर ५ लाख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -