इन्स्टाग्राम अकाऊंट वेरीफाईड करायचंय; मिळवा ब्लू टिक

इन्स्टाग्रामवर तुमचं अकाऊंट वेरीफाईड करायचंय? मग स्टेप्स फॉलो करा...

Instagram Verified Badge

जगभरात सध्या सोशल नेटवर्किंगसाठी कोणती साईट प्रसिद्ध असेल तर ती आहे इन्स्टाग्राम. फेसबुक आणि ट्विटरवरून तरूणाई आता इन्स्टाकडे वळलेलीये. इन्स्टाग्रामनेही आता आपल्या १ अब्ज युजर्सना एक खुशखबर दिलीये. ती म्हणजे तुम्हीही सेलिब्रिटिप्रमाणे तुमचे अकाऊंट वेरिफाईड करु शकता. म्हणजेच तुमच्या प्रोफाईलच्या नावापुढे सुंदर असं दिसणारं ब्लू टिक मार्क मिळू शकतं. काही दिवसांपूर्वी फेसबुकप्रमाणेच इन्स्टाचे अकाऊंट्स हॅक होत होते, त्यामुळे इन्स्टाने आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. याबदलातंर्गतच युजर्सना त्यांचे अकाऊंट वेरीफाईड करण्यासाठी इन्स्टाने सोय करुन दिलीये. यासाठी तुम्हाला तुमच्या अकाऊंटला लॉगिन करुन एक अर्ज भरावं लागेल. की बस्स. झालं तुमचं अकाऊंट वेरिफाईड.

तुम्ही तुमच्या इन्स्टा अॅपमधूनच ही प्रक्रिया पुर्ण करु शकता. पण जरा थांबा… एक्साईट होऊ नका. आधी इन्स्टा काय म्हणतं ते ऐका. इन्स्टाने स्पष्ट सांगितले आहे की, तुम्ही वेरीफिकेशनसाठी अर्ज करु शकता. याचा अर्थ तुम्हाला ब्लू टिक मिळेलच असं नाही. काही काळापूर्वी ट्विटरनेही भारतात अकाऊंट वेरीफिकेशनची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र काहीच लोकांना त्याचा लाभ मिळाला होता. ज्यांनी ज्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले त्यांना ट्विटरने ब्लू टिक दिली होती.

इन्स्टाने सांगितले आहे की, वेरीफाईड बॅच मिळवण्यासाठी तुम्हाला त्यांचे निकष पुर्ण करावे लागतील. आता आपण पाहुयात ते निकष काय आहेत? तुम्ही वापरत असलेले अकाऊंट तुमचे स्वतःचे किंवा कंपनीचे असले पाहीजे. शिवाय त्याच्याशी निगडीत सरकारी ओळखपत्र असणे गरजेचे आहे. टॅक्स बिल, बँक खात्याची माहिती चालू शकते. त्याशिवाय इन्स्टाने सांगितले आहे की कोणतेही अकाऊंट हे स्वतंत्र असले पाहीजे. म्हणजे समजा, तुमच्या कंपनीच्या ब्रँडची एकाच नावाची तीन अकाऊंट असतील तर त्यापैकी एकच वेरीफाईड होऊ शकते. तुम्ही तुमचा प्रोफाईल किती अप टू डेट ठेवलाय हे सुद्धा पाहिले जाईल. तसेच तुमचे अकाऊंट हे पब्लिक म्हणजेच सार्वजनिक असले पाहीजे. बायो अपडेटेड ठेवायचा आहे. तर स्पॅम लिंक्स नकोयत.

तुम्ही सर्व निकष जी पुर्ण केले तरी तुमची प्रसिद्धी कितीये? यावरच तुम्हाला वेरीफिकेशन मिळणार की नाही हे अवलंबून आहे. लोक तुम्हाला सर्च करतात का? हे देखील पाहिले जाणार आहे.

असे करायचे वेरीफिकेशन

वेरीफिकेशन मिळवण्यासाठी तुमच्या प्रोफाईलमध्ये मेन्यूला क्लिक करा. तिथे सेटिंग्जच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर ‘रिक्वेस्ट वेरीफिकेशन’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून पुढची प्रक्रिया पूर्ण करायची आहे की झालं काम… या दरम्यान इन्स्टाग्रामवर तुम्ही जी काही कागदपत्रे अपलोड कराल, ती कुठेही शेअर केली जाणार नाहीत याची श्वाशती इन्स्टाने दिली आहे. तर मग वाट बघू नका.. अॅपलाय करा.