घरट्रेंडिंगGauri Ganpati 2021 : दोन्ही सुनांना गौराईचा मान दिला, अन् मखरात बसवून...

Gauri Ganpati 2021 : दोन्ही सुनांना गौराईचा मान दिला, अन् मखरात बसवून केली पूजा

Subscribe

सासू सुनेचं नातं अगदी विळ्या भोपळ्याप्रमाणे असतं. सासूने केलेल्या काही गोष्टी सुनेला पटत नाहीत तर सुनेने केलेल्या गोष्टी सासूला. यामुळे घराघरात सासू सुनेचं भांडण नेहमी पाहायला मिळतं. मात्र वाशिम जिल्ह्यातील सासूबाईंनी या गोष्टींना अपवाद ठरल्या आहेत. सिंधुबाईंना चक्क आपल्या दोन्ही सुनांना गौराईचा मान देत मखरात बसवून त्यांची पूजा केली आहे. सिंधुबाई सोनुने असं या सासुबाईंच नाव आहे. त्यांनी आपल्या दोन्ही सुनांची गौराई म्हणून तीन दिवस पूजा करीत हा सण साजरा केला. सिंधूबाईंच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमळ उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

राज्यभरात गौराईचा सण मोठ्या उत्साहात पांरंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र प्रत्येकाची गौराईचं आगमन पाठवणी करण्याची पद्धत वेगळी असते. मात्र सिंधूताईंची ही पद्धत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे. यातून सुन सूनेचं नातं हे केवळ भांडणापूर्ती नसंत याची जाणीव होतेय. सासू आपल्या सुनांवर जीवपाड प्रेम करु शकतात माया करु शकतात हे अधोरेखित होतयं.

- Advertisement -

वाशिम शहरातील ड्रीम लॅन्ड सिटी येथे राहणार्‍या सिंधुबाई सोनुने यांनी गौरी पूजन सोहळा आपल्या दोन्ही सुनांची पूजा अर्चना करून त्यांना देवीचा मान देत हा सण साजरा केला. त्यांनी जीवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहळा साजरा करुन समाजापुढे नवा पायंडा पाडला. सासू आणि सुना यांच्यातील सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितले.

आजकाल घराघरात सासू आणि सुनेच भांडण आपण नेहमीच बघतो. मात्र, वाशिम जिल्ह्यात अशी एक सासू आहे. ज्या सासुबाईन आपल्या दोन्ही सुनेच चक्क गौराईच्या मंडपात बसवून त्यांना गौरीच रूप देत गौराई आगमनापासून ते विसर्जनापर्यंत त्यांची पूजा करत सण साजरा केला आहे. सासूबाईच्या या प्रेमाचा आम्हाला अभिमान आहे असं दोन्ही सुनांनी सांगितलं.

- Advertisement -

आजकाल अनेक घरांमध्ये सासू -सूनेच भांडळ, पिळवणुकीच्या घटना आपण नेहमी पाहतो. मात्र सिंधुताई यांनी या गोष्टींना बाजूला सारत एक सासू आपल्या सूनांवर मुलीप्रमाणे माया, प्रेम करु शकते याची जाणीव करुन दिली. त्यामुळे आम्हाला आमच्या सुनांना अभिमान वाटत असल्याचं त्यांच्या गौराई म्हणून पूजन होत असलेल्या सुनबाई रेखा सोनुने, यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं.


ताई तुझे थोर उपकार! भावाचा जीव वाचवण्यासाठी सख्ख्या बहिणीने केलं स्वत:च यकृतदान


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -