Netflixवर पहा Behind the scene, नेटफ्लिक्सच्या युझर्ससाठी N-Plusचे खास सबस्क्रिप्शन

N Plusमुळे पाहता येणार Behide the scenes

Watch Behind the scene on Netflix, a special N-Plus subscription for Netflix users
Netflixवर पहा Behind the scene, नेटफ्लिक्सच्या युझर्ससाठी N-Plusचे खास सबस्क्रिप्शन

जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग असेलेल्या Nerflix या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक विषयावरचा, वेगळ्या धाटणीचा त्याचप्रमाणे विविध भाषांमधील कंटेन आपल्याला पहायाला मिळतो. नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणात सिनेमे, वेब सीरिज पाहिल्या जात आहेत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमे, वेब सीरिजचे शुटींग बंद आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्सवर येणारा नवीन कनेंट काही प्रमाणात कमी झाला आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या युझर्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सने युझर्ससाठी N Plusच्या सबस्क्रिप्शनची घोषणा केली आहे. या सबस्क्रिप्शनमुळे युझर्सना आपल्या आवडत्या सिनेमांच्या शुटींगटचे, कार्यक्रमांचे Behind the Scenes पाहता येणार आहेत. आपल्या आवडत्या कार्यक्रमाचे किंवा सिनेमा, वेब सीरिजचे शुटींग कसे करतात हे पाहण्यासाठी युझर्सना प्रचंड उत्सुकता असते. N Plus सबस्क्रिप्शनमुळे हे पाहणे सोपे होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या N Plus प्लॅटफॉर्मचे नेटफ्लिक्सकडून टेस्टिंग सुरु आहे. त्याचप्रमाणे यासाठी एका सर्वेचे देखिल नियोजन केले जात असल्याचे कळत आहे. या सर्वेसाठी युझर्सना एक पाठविण्यात येत आहे. त्यात N Plusची संपूर्ण माहिती देण्यात येईल. या सर्वेनुसार कंपनी निर्णय घेणार आहे. युझर्सना N Plus वर टेक्स्ट, व्हिडिओ त्याचप्रमाणे मुलाखत, पॉडकास्ट आणि एनालिसीसही पाहता येतील.

N Plus चे खास वैशिष्ट्य

  • N Plus सबस्क्रिप्शनसाठी युझर्सना कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत.
  • N plus गुगल सर्चद्वारेही शोधता येईल.
  • ज्या युझर्सकडे नेटफ्लिक्सचा प्लॅन आहे तो युझर त्या प्लॅनच्या मदतीने Behide the scenes पाहू शकतो.
  • एखाद्या कार्यक्रमाचे नाव किंवा कास्ट टाकून Behide the scenes पाहता येतील.
  • मुख्य म्हणजे कंपनीने ज्या कार्यक्रमांचे Behide the scenes अपलोड केले आहेत तेच युझर्सना पहायला मिळणार आहे.
  • N Plusमध्ये नेटफ्लिक्स ओरिजनल्सचाही समावेश असेल.

    हेही वाचा – Mother’s Day निमित्त करिनाने चाहत्यांने दाखवली तिच्या दुसऱ्या बाळाची झलक, पहा फोटो