घरट्रेंडिंगएक मासा विकून वृद्ध महिला रातोरात झाली मालामाल!

एक मासा विकून वृद्ध महिला रातोरात झाली मालामाल!

Subscribe

एका वृद्ध महिलेने ना बँक, ना लॉटरीचे तिकीट विकत घेतले तरीही ती रातोरात श्रीमंत झाल्याचे समोर आले आहे. त्याचे कारण ऐकल्यावर तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. ही वृद्ध महिला एका माशामुळे मालामाल झाली आहे. शनिवारी या वृद्ध महिलेने एक प्रचंड मोठा मासा पकडला ज्याचे तिला ३ लाख रुपये मिळाले. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरबन परिसरातील सागर बेटात राहणाऱ्या या वयोवृद्ध महिलेचे नाव पुष्पा कर असे आहे. तिला मासेमारी करत असताना नदीतून ५२ किलोचा मासा सापडला. या माशासाठी तिला प्रति किलो रुपये ६ हजार २०० रुपये मिळाले. या वृद्ध महिलेने हा मासा विकून एकूण ३ लाख रुपये मिळवले. या महिलेला कधीच स्वप्नातही वाटते नव्हते की तिला माशासाठी इतकी मोठी रक्कम मिळेल.

- Advertisement -

याबाबत गावकऱ्यांनी सांगितले की, ‘हा मोठा मासा कदाचित एका जहाजाला धडकला आणि त्यानंतर तो मेला. सुदैवाने कोणत्या समुद्र प्राण्याने या माशाला गिळंकृत केले नाही. तसेच तो सडला देखील नाही.’ पुष्पा कर म्हणाली की, ‘ती मासेमारी करण्यासाठी गेली होती, त्यावेळी तिला हा मोठा मासा तरंगताना दिसला. तेव्हा तिने नदीत उडी मारली. तिला हा मासा काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण काही वेळात तिने मासा पकडून किनाऱ्यावर आणला.’ येथील गावकऱ्यांनी हा भोळा मासा असल्याचे सांगितले.

जेव्हा हा मासा सडण्यास सुरुवात झाली होती तेव्हा तो रबरा सारखा झाला होता. जरी तो मासा खाण्याचा लायक नसला तरी इतर कारणांसाठी वापरला जाऊ शकत होता. खास करून मासे औषधी उद्देशाने देखील वापरले जाऊ शकतात. त्यामुळे हा मासा विकला गेला आणि या वृद्ध महिलेच्या आर्थिक अडचणीही बऱ्यापैकी कमी झाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Video: दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला समुद्राच्या मध्यात जिवंत सापडली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -