Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग आजपासून सर्व टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य; वाचा सविस्तर

आजपासून सर्व टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य; वाचा सविस्तर

आजपासून म्हणजेच १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. पण Fastag म्हणजे काय? तो कोणत्या गाड्यांना आवश्यक आहे, कसा बसवायचा? वाचा सविस्तर...

Related Story

- Advertisement -

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag बंधनकारक केले असून आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी Fastag प्रणालीला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आहे असे स्पष्ट केले आहे. आजपासून म्हणजेच १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. पण Fastag म्हणजे काय? तो कोणत्या गाड्यांना आवश्यक आहे, कसा बसवायचा? वाचा सविस्तर…

फास्टटॅग म्हणजे…

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा केली जाते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर लाबंच लांब रांग लागते मात्र आता FASTag अनिवार्य असल्याने थांबण्याचीही गरज भासणार नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या वेळेसह इंधनाची देखील बचत तर होईलच पण टोल प्लाझावर होणारी ट्रॅफिक जॅमचा त्रासही वाचणार आहे.

या वाहनांसाठी Fastag अनिवार्य

- Advertisement -

जर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असेल तर तुमच्या वाहनासाठी Fastag गरजेचे आहे. तसेच तुमच्या गाडीला Fastag नसेल तर तुम्ही टोला प्लाझा पास करु शकत नाही. यासोबतच पिवळा रंग असणाऱ्या नंबर प्लेटची गाडी असेल तरी देखील तुम्हाला Fastag बसवावाच लागेल. केवळ दुचाकींना Fastag या पर्यायातून वगळण्यात आले आहे.

…नाहीतर लागेल दुप्पट टोल 

दरम्यान तुम्हाला नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी फास्टटॅग गरजेचे आहे. फास्टटॅग प्रणालीमुळे कॅश ट्रान्झेक्शनाच्या तुलनेत टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ बचत होणार आहे. पण जर Fastag नसेल तर आजपासून (१५ फेब्रुवारी) तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

- Advertisement -

जर तुमच्या वाहनावर FASTag स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावावे लागणार आहे. हे FASTag तुम्ही पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून खरेदी करू शकतात. तसेच, देशातील २३ बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जात आहे. तुमच्या जवळ असणारं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी अॅण्ड्रॉईड फोनवर My FASTag App डाऊनलोड करून त्यावरही तुम्ही फास्टॅगसाठी अर्ज करू शकता. अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या १०३३ या हेल्पलाईनवर फोन करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.

FASTag साठीचे नियम

1. FASTag मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व फोटो आवश्यक

2. १ लाख रुपयांपर्यंत FASTag रिचार्ज करता येणार

3. डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

4. टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवणे आवश्यक

- Advertisement -