ती विवाह करतेय पण… काय आहे sologamy trend ?

कोण आहे क्षमा बिंदू आणि ती का करतेय ?sologamy विवाह सोहळा. संपूर्ण जगभरातच हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि अशातच हा ट्रेंड भारतातही येऊन पोहोचलाय.

सध्या सोलोगॅमी ह्या ट्रेंड (sologamy trend) बद्दल खूप बोलले जात आहे आणि या पद्धतीने भारतात एक विवाह सोहळा पार पडणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, लग्न होतंय तर त्यात एवढं विशेष काय आहे. पण सोलोगॅमी (sologamy) पद्धतीने लग्न होणे हे भारतासाठी सध्या नवीन गोष्ट आहे. पण बाहेरील देशांमध्ये हा अश्या पद्धतीने विवाह सोहळे या आधीही झालेले आहेत. हा ट्रेंड नेमका काय आहे? याबद्दल एवढं का बोलले जात आहे? हा ट्रेंड भारतात कुठून आणि केव्हा आला? सोलोगॅमी म्हणजे नेमकं काय? संपूर्ण जगभरातच हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि अशातच हा ट्रेंड भारतातही येऊन पोहोचलाय. जाणून घेऊया या ट्रेंड विषयी.

११ जून रोजी भारतात अशाच पद्धतीचा एक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सोलोगॅमी पद्धतीने विवाह (sologamy trend marriage) होणार म्हणजेच स्वतःचीच लग्न करणे. संपूर्ण भारत या लग्न सोहळ्याचा साक्षीदार असेल. हा लग्न सोहळा क्षमा बिंदूचा (kshama bindu) आहे. ११ जून रोजी गुजरात राज्यातील वडोदरा मध्ये एका मंदिरात हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. इतर लग्नसोहळ्यांमध्ये ज्या पद्धतीने सगळे विधी होतात त्याच पद्धतीने याही लग्नात सगळे विधी यथोचित पद्धतीने होतील. मेहंदी, हळद, संगीत असे सगळेच विधी या लग्न समारंभात पार पडले जातील.ज्या पद्धतीने लग्नानंतर नाव विवाहित दाम्पत्य हनिमून ला जात त्याच पद्धतीने क्षमा हनिमून साठी ताब्बल दोन आठवडे गोव्याला जणार आहे. त्यामुळे या सगळ्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे.क्षमाचं वय २४ आहे आणि तो एक ब्लॉगर सुद्धा आहे. या सगळ्यावर क्षमाkshama bindu असं सांगते की, बऱ्याचदा लोक मला सांगायचे की मी परफेक्ट मॅच आहे. आणि यावर मी सुद्धा हो म्हणायचे आणि म्हणून मी स्वतःचीच निवड केली. क्षमा पुढे असंही म्हणाली की स्वतःशीचं लग्न करून मी आयुष्यभर स्वतःवर प्रेम करणार आहे स्वतःशी लग्न करणं म्हणजे स्वतःच स्वतःला दिलेलं एक वचन आहे. हे एक असं वचन आहे ज्यामध्ये तुम्ही जगात असलेले लाइफस्टाइल हे तुमच्या प्रगतीसाठी पोषक ठरणार आहे. या मध्ये तुम्ही स्वतःसाठी नेहमीच उपलब्ध असणारा अहात.

सोलोगॅमी नेमकं सुरु कधी झालं

सोलोगॅमी नेमकं कधी पासून सुरु झालं यावरही क्षमाने स्वतःचं मतं मांडत क्षमा म्हणते. माझ्या पैलूचा मी मनापासून स्वीकार करते हे दाखवण्याची हि पद्धत आहे. त्याचबरोबर माझ्यात असलेल्या उणीवा सुद्धा समर्थपणे स्वीकारणे म्हणजेच हि पद्धत आहे. यातून मला हेच सांगायचं आहे की मी स्वतःला स्वीकारलं आहे आणि मी जशी आहे तशीच. त्याचबरोबर क्षमा असंही सांगते की तिने जो निर्णय घेतला आहे. त्यात तिला तिच्या कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा मिळाला आहे. आणि तिच्या या लग्न सोहळ्याला तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सुद्धा उपस्थित असणार आहेत.

माझे पालक मला म्हणाले की तू नेहमीच वेगळा विचार करतेस आणि तुला ज्यात आनंद मिळतो तेच तू कारावस असंही क्षमा म्हणाली आणि त्याच बरोबर स्वतःसोबत लग्न केल्याची बातमी मी २० वर्षणापुर्वी ऐकली होती असंही क्षमा म्हणाली. मागच्या काही वर्षांत असे विवाह मोठ्या प्रमाणात झाले आहेत. यात सिंगल महिला सोलोगॅमीमध्ये आघाडीवर आहेत. या नववधू हातात पुष्पगुच्छ घेऊन पारंपरिक पोशाखात लग्नासाठी जातात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवारही या लग्न सोहळ्यात सहभागी होतात. या अशा विवाहsologamy  सोहळ्याची बातमी भारतात ऐकायला मिळणं हे आश्चर्यच आहे. भारतासाठी हा विषय जरी नवखा असला तरी इतर देशांमध्ये हा विषय काही नवीन राहिलेला नाही. त्यामुळे हि बातमी भारतात चर्चेचा विषय ठरली आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत 

क्षमाला जेव्हा तिच्या या निर्णयावर लोकांच्या काय प्रतिक्रियाcomments आहेत असं विचारांच्यात आलं तेव्हा ती म्हणाली, की मी जेव्हा मेंटल हेल्थ एक्सपर्ट सोबत या विषयावर बोलले तेव्हा त्यांनी सर्वात आधी यावर आश्चर्य व्यक्त केलं. त्याच बरोबर काही डॉक्टर असंही म्हणले की ही एक विचित्र संकप्लना आहे. प्रत्येकजण स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःवर प्रेम आहे हे दाखविण्यासाठी वेगळं काही कर्णयची गरज नसते. प्रश्न जेव्हा लग्नाचा येतो तेव्हा ते दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबाना एकत्र आणत असं मत चंदीगडच्या डॉ सविता मल्होत्रा यांनी मांडलं.

क्षमाच्या या निर्णयावर सोशल मिडियावर social media चर्चाना उधाण आलं आहे. यावर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींचं म्हणणं आहे की क्षमाने इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे तर काहींचं म्हणणं आहे की क्षमाचा दृष्टिकोन हा उरला आहे काहींनी तीच कौतुक केलं आहे तर काहींनी तिच्या या निर्णयावर समर्थन दर्शवल आहे. त्याचबरोबर मी कुणाशी लग्न करावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि सोलोगॅमी व्यक्ती ह्या नॉर्मल असतात हे सुद्धा मला समाजाला दाखवायचं आहे असं क्षमाने सांगितलं आहे.