घरट्रेंडिंगUnion Budget : बजेट आधी का करतात हलवा सेरेमनी?

Union Budget : बजेट आधी का करतात हलवा सेरेमनी?

Subscribe

बजेट सुरु होण्याआधी हलवा सेरेमनी केली जाते. नक्की काय असते ही हलवा सेरेमनी आणि ती का करतात? जाणून घ्या त्याबद्दल

आज संसदेत बजेट मांडलं गेलं. बजेट सादर झाल्यानंतर वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. पण बजेट तयार करण्याआधी एक वेगळाच उपक्रम राबवला जातो. जो खूप कमी लोकांना माहीत आहे. ‘हलवा सेरेमनी’ असे या उपक्रमाचे नाव आहे. त्यामागचे नेमक रहस्य काय? बजेट कसं तयार होतं? त्याची नेमकी प्रक्रिया काय असते? ते कुठे तयार होतं ? या सगळ्याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

काय आहे हलवा सेरेमनी

बजेटचं काम दहा दिवस चालतं. त्या काळामध्ये बजेट टीमला बाहेरच्या जगाशी संबंध ठेवण्यासाठी परवानगी नसते. त्यासाठी एक समारंभ केला जातो, त्याला हलवा सेरेमनी असं म्हणतात. यामध्ये एका मोठ्या कढईत शिरा म्हणजेच हलवा बनवला जातो आणि बजेट टीमला खायला दिला जातो. या समारंभानंतर बजेट टीम पुढच्या दहा दिवसांसाठी तळघरात जाते. त्यानंतर बजेटच्या कामाला सुरुवात होते. यावर्षी २१ जानेवारीला भारतीय अर्थमंत्रालयाची हलवा सेरेमनी पार पडली.

- Advertisement -

अशी करतात बजेटची तयारी

बजेट हे ‘टॉप सिक्रेट डॉक्युमेंट’ म्हणून ओळखले जाते. अत्यंत कडक सुरक्षिततेमध्ये हे बजेट तयार होतं. दिल्लीतील ‘नॉर्थ ब्लॉक’ मधील तळघरामध्ये बजेट तयार केलं जातं. बजेटचे काम दहा दिवस चालते. त्या काळामध्ये बजेट टीमला बाहेरच्या जगाशी आणि स्वत:च्या कुटुंबीयांशीदेखील संबंध ठेवण्यासाठी परवानगी नसते. याच दरम्यान कोणालाही मोबाईल फोन आतमध्ये नेता येत नाही. एक लँडलाईन फोन असतो, त्यात फक्त इनकमिंग कॉल्सची सुविधा असते. त्यावेळी सुद्धा गुप्तहेर खात्यातील माणूस तिथे हजर असतो.

इंटेलिजन्स ब्युरोच्या सुरक्षिततेमध्ये हे काम सुरु असतं. नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात प्रत्येक सदस्याला झोपण्यासाठी पलंग, काम करण्यासाठी टेबल तसेच खाण्याची सोय देखील तिथेच केलेली असते. आतमध्ये डॉक्टर आणि स्वयंपाकी देखील असतात. फक्त मोठ्या हुद्यातील काही अधिकाऱ्यांना बाहेर जाण्याची परवानगी असते. दहा दिवसानंतर बजेट तयार झाल्यावर ‘प्रुफ रिर्डस’च्या मदतीनं बजेटमधील चुका दुरुस्त केल्या जातात. तयार केलेले बजेट प्रिंटिंग प्रेसवर प्रिंट केलं जातं.

- Advertisement -

इंडियन आर्मी आणि पोलिसांच्या कडक सुरक्षेमधून बजेट संसदेत आणलं जातं. दहा मिनिटांपूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळाला संक्षिप्त रुप सांगितले जाते. इतकी सुरक्षा ठेवण्याचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेसंबंधितील कोणतीही महत्वाची माहिती बाहेर जाता कामा नये आणि तसे झाल्यास काही व्यापारी त्याचा गैरवापर करु शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -