Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या Aadhaar, PAN, Voter ID, Passport चे...

एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या Aadhaar, PAN, Voter ID, Passport चे काय करावे? सांगतायेत एक्सपर्ट

Related Story

- Advertisement -

पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ही सर्व सरकारी ओळखपत्र म्हणून काम करतात. मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सर्व सर्व सरकारी ओळखपत्रांचे काय होते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारस असणाऱ्यांना बहुतेक वेळा माहित देखील नसते की त्यांनी मृताच्या विविध अधिकृत कागदपत्रे आणि आयडीचे काय करावे. हे ओळखपत्र किती काळ आपल्याकडे ठेवावीत? तसेच, ही कागदपत्रे तयार करणार्‍या संस्थांना परत देता येऊ शकतात? जाणून घ्या, याबद्दल सविस्तर…

आधार कार्ड

आधार क्रमांक ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. जसे की, सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ, ईपीएफ खाती इत्यादींसारख्या ठिकाणी एलपीजी अनुदानाचा लाभ घेताना आधार क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी यांच्या मते, आधार म्हणजे एक वेगळा ओळख क्रमांक आहे. परंतु, कायदेशीर वारसदार किंवा कुटुंबातील सदस्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे की आधारचा गैरवापर होणार नाही. यासह त्यांनी असेही सांगितले की, UIDAI कडे मृत व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया नाही. तसेच धारकांच्या मृत्यूची माहिती आधार डेटाबेसमध्ये अद्ययावत करण्याचीही तरतूद नाही.

मतदान ओळखपत्र

- Advertisement -

जितेंद्र सोलंकी यांनी सांगितले, ‘मतदार ओळखपत्र असल्यास मतदार नोंदणी नियम १६० अंतर्गत त्या व्यक्तीच्या मृत्यूवर ते रद्द करण्याची तरतूद आहे. मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांनी स्थानिक निवडणूक कार्यालयात जाऊन भेट देणं आवश्यक आहे. निवडणुकीच्या नियमांनुसार एक विशेष फॉर्म म्हणजेच फॉर्म क्रमांक ७ भरावा लागणार असून यासह मृत्यूच्या दाखल्यासह मतदान ओळखपत्र रद्द करण्याची कागदपत्र सादर करावे लागणार आहे.

पॅनकार्ड

पॅन कार्डचा उपयोग बँकेची खाती, डिमॅट खाती, मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरणे अशा विविध कारणांसाठी अनिवार्य नोंद म्हणून केला जातो. पॅन नमूद करणे अनिवार्य असणारी सर्व खाती बंद होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीसाठी पॅन अनिवार्य आहे. आयटीआर भरण्याच्या बाबतीत आयकर विभागामार्फत कर परतावा भरण्याची प्रक्रिया होईपर्यंत पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. आयकर विभागाशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाल्यावर उत्तराधिकारीने एकदा आयकर विभागाशी संपर्क साधून पॅन कार्ड सरेंडर करावे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -