तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट आहे, तर ही बातमी नक्की वाचा

WhatsApp fake news: These ₹500 currency notes are not fake, government clarifies
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट आहे, तर ही बातमी नक्की वाचा

नोटबंदीपासून लोकं नव्या-जुन्या नोटीबाबत खूप सतर्क झाले आहेत. खासकरून २००० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटांबाबत काही दिवसांपासून अनेक बातम्या येत आहेत. सध्या एक ५०० रुपयांच्या नोटीसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन ५०० रुपयांच्या नोटांमधील फरक सांगितला आहे. ज्यात एक नोट असली आणि दुसरी नोट नकली असल्याचे म्हटले जात आहे. पण हा व्हिडिओ लोकांची दिशाभूल करत आहे.

या व्हिडिओतून इशारा दिला जात आहे की, ५०० रुपयांची अशी नोट घेतली नाही पाहिजे, ज्यावर हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या सहीजवळ नसून गांधीजींच्या फोटो जवळ आहे. ही नोट नकली असल्याचे सांगितले जात आहे.

लोकांची दिशाभूल करणारी माहिती या व्हिडिओतून देण्यात आली आहे. हा व्हिडिओ फेक आहे. आरबीआयनुसार ५०० रुपयांच्या दोन्ही नोटी वैध आहेत. ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या सही जवळ आहे आणि ज्यात हिरवी पट्टी गांधींजीच्या फोटो जवळ आहे.

PIBFackCheckने आरबीआयच्या माहितीनुसार दोन्ही प्रकारच्या ५०० रुपयांच्या नोट वैध आहेत. त्यामुळे ५०० रुपयांच्या या दोन्ही नोटी देवाणघेवाणसाठी वापरू शकता. दरम्यान केंद्र सरकारने २०१६मध्ये नोटबंदीनंतर ५०० रुपयांची नवीन नोट बाजारात आणली होती.


हेही वाचा – १ जानेवारीपासून ATM मधून पैसे काढल्यास ग्राहकांना बसणार मोठा फटका, RBIने जारी केली नियमावली