घरट्रेंडिंगबोंबला ! Reel बनवण्याच्या नादात स्वत:च्याच पाठीला लावली आग, पाहा व्हिडीओ

बोंबला ! Reel बनवण्याच्या नादात स्वत:च्याच पाठीला लावली आग, पाहा व्हिडीओ

Subscribe

रिल्स तयार करण्यासाठी ही तरुण मंडळी जीवाची बाजी लावायला ही तयार असतात. रिल्स बनवणं किती आणि कोणत्या प्रकारे महागात पडू शकतं हे आपण अनेकदा पाहिलं आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारी आजकालची मंडळी ही रिल्सची दिवानी आहेत. रिल्स बनवणं आणि प्रसिद्ध होणं हा सध्याचा नवा ट्रेंड आहे. मग ते रिल्स तयार करण्यासाठी ही तरुण मंडळी जीवाची बाजी लावायला ही तयार असतात. रिल्स बनवणं किती आणि कोणत्या प्रकारे महागात पडू शकतं हे आपण अनेकदा पाहिलं आहे. असाच एक प्रकार एका तरुणाच्या बाबतीत घडलाय. पठ्ठ्याने रिल्स बनवण्याच्या नादात थेट स्वत:च्या पाठीलाच आग लावलीय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडीओत तरुण रिल्स बनवण्यासाठी एक स्टंट करतो. कॅमेरासमोर पाठ करुन लाइटर घेऊन काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अचानक लायटरमधून ठिणगी उडते आणि त्याच्या पाठिवर पडून क्षणात पेट घेते.

- Advertisement -

पाठीला आग लागल्यानंतर तरुण जोर जोरात ओरडून टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करत बाथरुममध्ये जातो. हा व्हिडीओ पाहताना जरी मजेशीर वाटत असला तरी असे स्टंट करणं कसं जिवावर बेतू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे.

आधी देखील अशाप्रकारचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांना यातून मोठा फटका देखील बसला आहे.  केवळ स्टंटच नाही तर रिल्सच्या माध्यमातून अश्लिल भाषा वापरणारे अनेक क्रिएटर्स देखील चर्चेत आले आहेत. थेरगाव क्विन त्याचे एक उदाहरण आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  पुष्पाचा फ्लॉवर डायलॉग मारून भाईगिरी करणाऱ्या गुंडाला, भरचौकातच महिला पोलिसांनी दाखवली फायर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -