घरट्रेंडिंगजाणून घ्या! व्हेलेंटाईन-डे ची खरी कहाणी, नक्की कोण आहे हा व्हेलेंटाईन?

जाणून घ्या! व्हेलेंटाईन-डे ची खरी कहाणी, नक्की कोण आहे हा व्हेलेंटाईन?

Subscribe

व्हॅलेंटाईन डे" दोन प्रेमयुगुलांसाठी खास आहे. हा दिवस विशेषतः तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रेमाच्या या उत्सवाबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात विविध प्रश्न येतात. आज आम्ही त्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

सध्याच्या काळात व्हेलेंटाईन डे ला घेवून तरुण पिढीमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. साधारणत: प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा हा अनोखा उत्सवच आहे. परंतु बऱ्याचशा लोकांना हा दिवस साजरा का केला जातो, याचे महत्त्व काय आहे, हा प्रश्न बहुतेकदा सतावत असतो. आज आम्ही तुम्हाला या सर्व अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे देणार आहोत की, ज्याचा उल्लेख इतिहासात आणि पुस्तकांमध्ये आहे.

व्हेलेंनटाईन डे मागची खरी कहाणी

व्हेलेंटाईन डे बद्दल ‘ऑरिया ऑफ जैकोबस डी वाॅरिजीन ‘ ह्या पुस्तकात उल्लेख केला होता. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, ही कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. संत व्हेलेंटाईन हे प्रेमाला फार प्रोत्साहन करायचे, त्याच काळात रोमच्या राजा क्लॉडियसचा प्रेमप्रकरणाला तीव्र विरोध होता. कारण त्याला प्रेमविवाहावर विश्वास नव्हता. क्लॉडियसने आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती, पण संत व्हेलेंटाईनने अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. राजाला राग अनावर झाल्याने त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवलं.

- Advertisement -

व्हॅलेंटाईन डे कसा सुरू झाला?

हा दिवसाची सुरूवात एका रोमन उत्सवापासून झाली. रोममध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत ‘Lupercalia’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले बॉक्समधून मुलींच्या नावे काढत असत. उत्सवा दरम्यान ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरत असत आणि कधी कधी ते लग्नबंधनात देखील बांधली जात. नंतर तेथील चर्च ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात केली. यानंतर, लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन नावाचा वापर करू लागले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -