घरटेक-वेकएक वर्ष स्मार्टफोन वापरु नका आणि जिंका '७२ लाख'

एक वर्ष स्मार्टफोन वापरु नका आणि जिंका ‘७२ लाख’

Subscribe

तुम्हाला वर्षभर तुमच्या स्मार्टफोन पासून दूर रहावे लागले आणि त्याबदल्यात तुम्हाला ७२ लाख मिळणार असतील तर... आहे ना गमंत. मग हे वाचा आणि ७२ लाख जिंकण्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

तुम्हाला एक दिवस आपला स्मार्टफोन वापरु नका, असे जर कुणी सांगितले तर तुम्ही राहु शकाल का? अर्थातच सर्वांचेच उत्तर नाही असे असेल. कारण आज स्मार्टफोन हा जणू आपल्या शरीराचा एक अवयवच झाला आहे. स्मार्टफोन शिवाय आयुष्य ही कल्पनाच आजच्या पिढिला करणे शक्य नाही. मात्र कोका कोला कंपनीच्या विटामिन वॉटर या उत्पादनाने एक आश्चर्यकारक योजना आणली आहे. ही कंपनी एक वर्ष स्मार्टफोन न वापरण्याचे चॅलेंज देत आहे. जर तुम्ही एक वर्ष स्मार्टफोन वापरला नाहीत तर तुम्ही तब्बल ७२ लाख रुपये जिंकू शकता!

असे व्हा या स्पर्धेत सहभागी

तुम्ही ८ जानेवारी २०१९ पर्यंत या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तर तुमच्या ट्विटरवर किंवा इन्स्टाग्रामवर तुम्ही स्मार्टफोनशिवाय वर्षभर कसे राहणार याचे कल्पक उत्तर द्यायचे आहे. या उत्तरासोबत तुम्हाला #NoPhoneforaYear आणि #Contest असे दोन हॅशटॅग ठेवायचे आहेत. ज्या स्पर्धकाचे उत्तर मजेशीर आणि क्रिएटिव्ह असेल त्याला कंपनीतर्फे या स्पर्धेसाठी निवडले जाईल.

- Advertisement -

स्पर्धेचे निकष असे असतील

सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना रोजच्या आयुष्यातून बाजुला होण्याची गरज भासणार नाही. त्यांना १९९६ सालचा बेसिक मोबाईल फोन दिला जाईल. ज्यामध्ये इंटरनेट किंवा इतर अॅप्लिकेशनची सुविधा नसेल. फक्त कॉलवर बोलण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच स्पर्धकांना स्वतःचा किंवा दुसऱ्याचाही स्मार्टफोन वापरता येणार नाही. मात्र लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युंटर वारण्याची मुभा असेल.

या स्पर्धेत निवड झाल्यानंतर कदाचित तुम्ही वर्षभर स्मार्टफोनशिवाय राहू शकणार नाहीत. पण समजा तुम्ही कमीत कमी सहा महिने जरी स्मार्टफोनशिवाय राहू शकलात तर तुम्हाला १० हजार डॉलर्स (म्हणजेच ७.२ लाख) मिळू शकतात, असे विटामीन वॉटरतर्फे सांगण्यात आले आहे. कल्पकता, नवनिर्मिती आणि आमच्या ब्रँडला साजेशी प्रसिद्धी मिळवणे, असे तीन उद्देश समोर ठेवून ही स्पर्धा आयोजित केली आहे, असे कोका कोलाची मालकी असलेल्या विटामिन वॉटरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -