Video : प्रिया वॉरियर त्याला किस करायला जाते आणि तो…

‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नवारुपाला आलेली प्रिया प्रकाश वॉरियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली असून सध्या तिचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Wink girl priya prakash varrier gets ready to kiss him in viral video
प्रिया वारियर त्याला किस करायला जाते आणि तो

मागील वर्षात ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नवारुपाला आलेली प्रिया प्रकाश वॉरियरआता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रिया वॉरियरचा २६ सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने एका मुलाकडे पाहून डोळा मारतानाचे जे काही एक्स्प्रेशन्स दिले होते, त्यावर संपूर्ण जग घायाळ झाले होते. भारताबाहेरही हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता आणि पुन्हा एकदा प्रिया वॉरियरने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडिओची सध्या चर्चा होत आहे.

काय आहे या व्हिडिओत

अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओमध्ये सिनेमॅटोग्राफर सिनू सिद्धार्थ आणि प्रिया एकमेकांना किस करु पाहतात पण त्यात एक ट्विस्ट आहे. किस करण्यासाठी एकमेकांजवळ येताच सिनेमॅटोग्राफरचे लक्ष वेगळ्याच गोष्टीकडे जाते आणि तो प्रियाला किस न करता पाण्याचे सेवन करतो. या व्हिडिओला  आतापर्यंत १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सिनेमॅटोग्राफर सिनू सिद्धार्थ विषयी थोडक्यात

प्रियाच्या ओरु अदार लव्हया पहिल्या मल्याळम चित्रपटासाठी सिनू सिद्धार्थने सिनेमॅटोग्राफचे काम केले होते. प्रियाच्या हातात सध्या दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. त्यापैकी एक श्रीदेवी बंगलोआणि दुसरा लव्ह हॅकर्सआहे. याचसोबत तिने एक तेलगू चित्रपट सुद्धा साइन केला आहे.


हेही वाचा – ‘प्रिया वॉरियरच्या लोकप्रियतेचा ना हेवा वाटतं ना ईर्षा’