Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग व्हिलचेअरवर भीक मागणाऱ्या नफीसाच्या बँक खात्यात मिळाले कोट्यवधी

व्हिलचेअरवर भीक मागणाऱ्या नफीसाच्या बँक खात्यात मिळाले कोट्यवधी

Related Story

- Advertisement -

रस्त्यावर आपण रोजच भिकारी बघत असतो. आपल्याला त्यांची किव येते. प्रत्येक धर्मात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही दान करत असतो. मात्र भिकाऱ्यांचे नेमके उत्पन्न किती? याबद्दल कुणीही विचार करत नाही. मात्र इजिप्तच्या एका महिला भिकारीची संपत्ती पाहून तुमचे डोळे फिरतील. या भिकारणीच्या बँक खात्यात १.४ कोटींची रक्कम मिळाली आहे. तसेच ही महिला ५ इमारतींची मालकीन आहे. व्हिलचेअर बसून भीक मागणाऱ्या ५७ वर्षीय महिला भिकारणीला आता पोलिसांनी अटक केली आहे.

गल्प न्यूजने दिलेल्या बातमीनुसार या महिलेचे नाव नफीसा असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या बँक खात्याचा तपशील मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. व्हिलचेअरवरुन लोकांकडे मदतीची याचना करणारी महिला स्वतःला विकलांग असल्याचे दाखवायची. नफीसा आपल्याला अर्धांवायूचा झटका आल्याचे भासवून व्हिलचेअरवर बसून भीक मागायची. इजिप्तमधील अनेक राज्यांत ती फिरून भीक मागण्याचे काम करत होती.

- Advertisement -

नफीसाची भीक मागण्याची पद्धत अतिशय प्रोफेशनल होती. जेव्हा भीक मागायची असेल तेव्हाच ती व्हिलचेअर वापरायची. अन्य वेळेला ती आपल्या पायांवर फिरत असे. एका व्यक्तीने नफीसाला स्वतःच्या पायावर फिरताना पाहिले, तेव्हा हा प्रकार उजेडात आला. नफीसाचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली तसेच तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिला कोणताही आजार नसल्याचे समोर आले.

 

- Advertisement -