घरट्रेंडिंगVideo: कचरा वेचणाऱ्या आजीबाईंचं फर्राटेदार इंग्लिश ऐकून व्हाल चकीत

Video: कचरा वेचणाऱ्या आजीबाईंचं फर्राटेदार इंग्लिश ऐकून व्हाल चकीत

Subscribe

आजीबाई बोलत असलेली अस्खलित इंग्रजी ऐकून नेटकरी देखील चकीत झाले आहेत

आपल्याला रोज अनेक लोक भेटत असतात. मात्र त्यांच्याकडे पाहून त्यांच्या शिक्षणाचा अंदाज बांधता येत नाही. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीकडे पाहून तो कसा असेल किंवा काय करत असेल असा अंदाज लावण्यात येतो. मात्र बऱ्याचदा हे अंदाज चुकतात आणि आपण कमी लेखलेला व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ समजला जातो. असच काहीसे झालेय बंगळुरूमधील काही तरुणींसोबत. त्यांना बंगळुरूच्या रस्त्यांवर एक आजीबाई भेटली जी रस्त्यावरचा कचरा वेचण्याचे काम करते. कोणालाही विश्वास बसणार नाही मात्र ही कचरा वेचणारी आजी इतक फर्राटेदार इंग्लिश बोलते की तिचे इंग्लिश ऐकून सर्वच चकीत झाले आहेत. सध्या कचऱ्या वेचणाऱ्या आजीबाईंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (woman picks up garbage peak fluent English in bangalore Video viral on social media)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shachina Heggar (@itmeshachinaheggar)

- Advertisement -

इन्स्टाग्रामवर एका युझरने या आजीबाईंचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात रस्त्यावरचा कचरा वेचणारी आजीबाई दिसत आहे. ज्यात ती असे म्हणत आहे की, ती सात वर्ष जपानमध्ये काम करत होती. सात वर्षांनी ती भारतात परतली  आहे. या व्हिडिओत ती आजीबाई इंग्लिशमध्ये एक गाणे सुद्धा गाताना दिसत आहे. तिच्या आयुष्यातील काही घटना देखील ती या व्हिडिओत सांगताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडिओ  बंगळुरूच्या सदाशिवनगर जवळील एका कचरा कुंडीजवळचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shachina Heggar (@itmeshachinaheggar)

- Advertisement -

या व्हिडिओ ती आजीबाई बोलत असलेली अस्खलित इंग्रजी ऐकून नेटकरी देखील चकीत झाले आहेत. अशा अनेक लहान लहान गोष्टी सतत आपल्या आजूबाजूला असतात, असे म्हणत अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत गाणे बोलणारी आजी बाई रस्त्यावरचा कचरा,प्लॉस्टिक वेचते ते विकून येणाऱ्या पैशातून ती तिचा रोजचा खर्च भागवते.


हेही वाचा – ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला स्वातंत्र्य दिनाची खास भेट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -